चंद्रपूर – (Chandrapur Sunday Market) मध्ये आज मनपाच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेदरम्यान प्रचंड राडा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरील अवैध दुकाने हटवण्यासाठी महानगरपालिकेचे पथक दाखल झाले होते.
या कारवाई दरम्यान काही अनधिकृत व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवल्याने दोन गटात तीव्र तणाव निर्माण झाला. पाहता पाहता या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या गोंधळामुळे शहरातील मुख्य मार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.
Chandrapur Sunday Market: मनपाच्या धडक कारवाई दरम्यान शहरात मोठा गोंधळ
शहरात अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या संडे मार्केट मध्ये आज चांगलाच राडा झाला, अधिकृतपणे या मार्केट मध्ये व्यवसाय करणाऱ्यांची संख्या हि १५० पर्यंत आहे मात्र आज या मार्केटच्या नावाने अनेक व्यापारी रविवारी सुद्धा दुकान सुरु ठेवतात. त्यामुळे प्रत्यक्ष संडे मार्केट मध्ये येणाऱ्यांची गर्दी काही प्रमाणात कमी झाली आहे. आज मनपा अतिक्रमण विभाग अवैध दुकाने हटविण्यासाठी आली असता त्याठिकाणी दोन गुटात राडा झाला. (वारकरी कुटुंबाच्या मदतीला धावले सुधीर मुनगंटीवार)
संडे मार्केट पूर्वी रघुवंशी कॉम्प्लेक्स जवळ लागत होते, त्यानंतर प्रशासनाने सदर व्यापाऱ्यांना जयंत टॉकीज ते झाडे हॉस्पिटल या मार्गावर आपली दुकाने लावण्याबाबत सांगितले, याठिकाणी एका लाईन मध्ये तब्बल १५० व्यवसायिक दुकान लावत होते, मात्र काही जणांनी या मार्केट मध्ये घुसखोरी केली.
गांधी चौक ते जटपुरा गेट पर्यंत सर्वच व्यापारी आता संडे मार्केटच्या नावाने व्यवसाय करतात त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले, याचा परिणाम वाहतूक व्यवस्था कोलमडली, त्यामुळे आज मनपाच्या अतिक्रमण पथकाने रविवारी सुट्टीच्या दिवशी अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली, मात्र या कारवाईला काहींनी विरोध दर्शविल्याने दोन गटात तणाव निर्माण झाला. यामुळे वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
निव्वळ रविवारी पोटाची खळगी भरण्यासाठी व्यवसाय करणाऱ्या लहान व्यावसायिकांना आता मोठे दुकानचालक संडे मार्केटच्या नावाखाली आव्हान देताना दिसत आहे, त्यामुळे शहरात जागोजागी मुख्य मार्गावर अनेक मोठे व्यवसायी संडे मार्केटच्या नावाने व्यवसाय करीत आहे. मनपाने संडे मार्केटच्या नावाखाली सुरु असलेले दुकानाचे अतिक्रमण तात्काळ काढावे अशी मागणी संडे मार्केट व्यावसायिकांनी केली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






