Mul Weightlifting Champions जिल्हास्तरीय स्पर्धेत पदक विजेते खेळाडू

मूलच्या खेळाडूंचे वेटलिफ्टिंगमध्ये वर्चस्व; ११ जणांची नागपूर विभागीय स्पर्धेसाठी निवड

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 20, 2026

मूल / चंद्रपूर: Mul Weightlifting Champions क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य (पुणे) यांच्या वतीने चंद्रपूर येथे रविवारी (२० सप्टेंबर) पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत मूलच्या खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. विविध वजन गटांत मूल तालुक्यातील तब्बल ११ खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले असून, आता हे सर्व खेळाडू आगामी नागपूर विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. (दीक्षाभूमीचा कायापालट होणार, वाचा हि महत्वाची बातमी)

Mul Weightlifting Champions: जिल्हास्तरीय स्पर्धेत कोणी बाजी मारली

मूल येथील क्रीडा संकुलात ‘एनआयएस’ (NIS) कोच करण सुरेश कोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणाऱ्या नवभारत विद्यालय, कर्मवीर महाविद्यालय आणि माऊंट कॉन्व्हेंटच्या खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेत तालुक्याचा नावलौकिक वाढवला. यामध्ये १७ वर्षांखालील मुलींच्या गटात ४४ किलो वजनी गटातून त्रिशा घोंगडे, ४८ किलो गटातून ईशानी मोहूर्ले आणि ७७ किलोवरील गटातून प्रणाली झरकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. मुलांच्या १७ वर्षांखालील गटात ५६ किलो वजनी गटात गुरविंदरसिंग बावरी, ६० किलो गटात अनिश राऊत आणि ७९ किलो गटात संस्कार नरेड्डीवार यांनी बाजी मारली.

मुलींच्या व मुलांच्या विविध वजन गटांतील विजेते

तसेच १९ वर्षांखालील मुलींच्या गटात ४८ किलो वजनी गटातून जसविंदर बावरी, ५३ किलो गटातून श्रावणी आंबूलकर, ५८ किलो गटातून शिवांगी वाढई आणि ८६ किलोवरील वजनी गटात नंदिनी चौधरी यांनी अव्वल स्थान पटकावले. याच वयोगटातील मुलांच्या ६५ किलो वजनी गटात अमन शेख याने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत प्रथम क्रमांक मिळवला.

गेल्या चार वर्षांपासून मूल येथील क्रीडा संकुलात खेळाडूंना वेटलिफ्टिंगचे मोफत प्रशिक्षण दिले जात असून, या सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर सलग यंदाही जिल्ह्याच्या क्रीडा पटलावर मूल शहराने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. या घवघवीत यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, तालुका क्रीडा संयोजक नामदेव पिजुरकर, रूपचंद उराडे, आकाश चौधरी आणि स्वप्निल अवघडे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे व प्रशिक्षक करण कोसरे यांचे अभिनंदन करून नागपूर विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment