ajay sarkar externed chandrapur

माजी नगरसेवक अजय सरकार ३ महिन्यासाठी हद्दपार

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 15, 2026

चंद्रपूर – (ajay sarkar externed chandrapur) प्रकरणात चंद्रपूर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. माजी नगरसेवक आणि भाजपचे कार्यकर्ते अजय सरकार यांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. सरकार यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. बंगाली कॅम्प परिसरात त्यांची मोठी दहशत होती. अखेर १४ जुलै रोजी त्यांच्या तडीपारीचा अंतिम आदेश जारी झाला. या कारवाईमुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

ajay sarkar externed chandrapur : प्रशासनाचा तडकाफडकी निर्णय

माजी नगरसेवक भाजप कार्यकर्ते अजय सरकार यांना प्रशासनाने दणका देत त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई केली आहे, यापूर्वी सुद्धा त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई झाली होती. अजय सरकार हे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. (सिलेंडरचा अख्खा ट्र्क गायब, गुन्हे शाखेने केला गुन्ह्याचा उलगडा)

अजय सरकार यांचेवर एकूण १७ गुन्हे दाखल होते त्यापैकी त्यांची ८ प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली होती, सध्या ९ गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहे, सरकार यांना हद्दपार करावे अशी मागणी चंद्रपूर भाजपने केली होती हे विशेष. बंगाली कॅम्प प्रभागात सरकार हे नगरसेवक होते, नुकत्याच झालेल्या २०२६ मधील मनपा निवडणुकीत त्यांना भाजपचे तिकीट मिळाले नव्हते, त्यानंतर ते अपक्ष उभे राहिले मात्र त्यांचा भाजप उमेदवार बिस्वास यांनी दारुण पराभव केला होता.

विशेष बाब म्हणजे त्यांच्या दाखल असलेल्या सर्व गुन्ह्याची नोंद रामनगर पोलीस स्टेशनमध्ये आहे, वर्ष २००७ पासून आतापर्यंत सरकार यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, अश्लील शिवीगाळ, मारहाण करणे असे गुन्हे दाखल झाले होते, त्यांची बंगाली कॅम्प प्रभागात दहशत असल्याने त्यांच्या विरोधात कुणीही साक्ष द्यायला समोर येत नसल्याने सरकार यांची दादागिरी वाढतच गेली होती. जून महिन्यात अजय सरकार विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता मात्र तो रद्द करण्यात आला.

सरकार यांच्यावर अनेकदा पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केली होती मात्र त्यानंतरही त्यांच्यावर काही प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले होते. हद्दपारीच्या कारवाईचा प्रस्ताव २ वर्षाकरिता होता, प्रशासनासमोर सरकार यांनी नवीन गुन्हे राजकीय सूडबुद्धीने व विरोधकांच्या संगनमताने दाखल केले असल्याचे म्हटले. कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर असल्याने हद्दपारीची कारवाई कमी कालावधीची करावी अशी मागणी करण्यात आल्याने अजय सरकार यांना ३ महिन्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश १४ जुलै रोजी पारित झाला.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment