korpana rojgar melawa registration

चंद्रपुरात सिमेंट कंपन्यांमध्ये थेट नोकरीची संधी; मेळावा कुठे?

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 15, 2026

कोरपना – (korpana rojgar melawa registration) प्रक्रियेला चंद्रपूर जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी सुरुवात झाली आहे. जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा कौशल्य विकास केंद्र आणि डाखरे महाराज फाऊंडेशन यांच्या वतीने वडगाव (ता. कोरपना) येथे १७ जुलै २०२६ रोजी भव्य पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० वाजल्यापासून हनुमान मंदिर परिसरात हा मेळावा सुरू होईल. यामध्ये नामांकित सिमेंट कंपन्यांसह विविध क्षेत्रातील १४५ रिक्त जागांसाठी थेट भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. (शेतातील वीज वायर चोरीला, वीज पुरवठा ठप्प, शेतकरी हवालदिल)

korpana rojgar melawa registration : महास्वयंम पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य

जिल्ह्यातील १० वी, १२वी, आय. टी. आय., पदविका, पदवी इत्यादी उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, जिल्ह्यातील नामांकीत उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने, सदर रोजगार मेळावा आयोजन करण्यात येत आहे.

सदर रोजगार मेळाव्यामध्ये मुख्यंमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, प्रधानमंत्री इंटर्नशीप योजना व इतर असे एकूण १४५ पदे भरण्यात येणार असून विविध नामांकित कंपन्या सहभागी होत आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये १. दालमिया सिमेट (भारत) लिमिटेड, २. अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, आवारपूर माणिकगड सिमेंट वर्कस) ३. अंबुजा सिमेंट, लिमिटेड उपरवाही तह. कोरपना जि. चंद्रपूर ४. वसंतराव नाईक उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय कोरपना ५. सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर ६. व्ही.आर इंटरप्राईजेस  ७. सहयोग मल्टिस्टेट क्रेडरेटिव्ह सोसायटी इत्यादी कंपन्याचे विविध रिक्त पदे असल्याचे नियोक्ते कडून कळविण्यात आलेले आहे.

मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे तसेच रिझ्यूमच्या प्रतीसह (कमीत कमी तीन प्रती) उपस्थित राहावे, जिल्हातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी होण्याकरीता तसेच रोजगार मेळाव्यात सहभागी उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in/ https://www.cmykpy.mahaswayam.gov.in/https://pminternship.mca.gov.in  या वेबपोर्टलवर रिक्त पदे अधिसूचीत करण्याबाबत तसेच उमेदवारांनी सदर रोजगार मेळावा मध्ये सहभाग घेण्याकरीता सदर पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांनी केले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment