Gondpipri Gambling Raid action by Chandrapur Police

गोंडपिपरीत पोलिसांची कारवाई; जुगार खेळणारे ४ जण अंधारात पळाले!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 17, 2026

चंद्रपूर: गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी एका मोठ्या जुगार अड्ड्यावर धडक कारवाई केली. या संदर्भातील सविस्तर माहिती (Gondpipri Gambling Raid) समोर आली आहे. गावातील एका सार्वजनिक चौकात सिमेंट रोडवर सुरू असलेल्या या अवैध जुगारावर पोलिसांनी अचानक छापा टाकला. पोलिसांनी जुगाराच्या डावावरून आणि आरोपींच्या अंगझडतीतून रोख रकमेसह मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात जुगार चालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. (हे हि वाचा – ताडाळी मध्ये मोठ्या प्रमाणात डिझल चोरी)

Gondpipri Gambling Raid: पोलिसांना मिळाली होती गुप्त माहिती

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सखोल माहितीनुसार, १६ जुलै रोजी रात्री (Gondpipri Police) गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार सुनील मनोहर गव्हारे हे अन्य पोलीस (police) कर्मचाऱ्यांसह पोलीस स्टेशन हद्दीत खाजगी वाहनाने जुगार रेड (Gambling Raid) आणि गस्तीच्या मोहिमेवर रवाना झाले होते. यादरम्यान पोलीस पथक गस्तीवर असताना रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास त्यांना विश्वासू मुखबिराकडून खात्रीशीर बातमी मिळाली की, करंजी गावातील नानाजी गोहणे यांच्या घरासमोरील चौकात काही इसम ५२ ताश पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हार-जितीचा जुगार (Gambling) खेळत आहेत.

मिळालेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी करंजी गावातीलच दोन पंचांना बोलावून घेतले आणि त्यांना कायदेशीर कारवाईची पूर्वकल्पना देऊन सोबत घेतले. त्यानंतर पोलीस कर्मचारी आणि पंचांचे पथक लपत-छपत मुखबिराने सांगितलेल्या घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले.

रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास करंजी येथील नानाजी गोहणे यांच्या घराजवळील चौकात पोलीस पथक पोहोचले असता, काही इसम गोलाकार बसून सिमेंट रोडवर विटांच्या प्रकाशात पैशांची बाजी लावून जुगार खेळताना रंगेहात आढळून आले. पोलीस पथकाने पंचांच्या मदतीने अत्यंत सावधगिरीने योग्य संधी साधून या जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकला. पोलिसांना पाहताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आणि तिथे उपस्थित असलेल्या ८ जणांपैकी ४ जण अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळून गेले. मात्र, पोलिसांनी सतर्कता दाखवत उर्वरित ४ जणांना जागीच ताब्यात घेतले. पोलिसांनी पंचांसमक्ष स्वतःची ओळख देऊन घटनास्थळाची झाडाझडती घेतली असता, सिमेंट रोडवर ३० रुपये किमतीचे ५२ ताश पत्ते आणि जुगाराच्या डावावर लावलेले ४५० रुपये रोख मिळून आले.

यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चारही आरोपींची वैयक्तिक अंगझडती घेतली. यामध्ये आरोपी साहिल अरुण गोहणे (वय २१) याच्याकडे २०० रुपये, करण विनोद मोहुर्ले (वय १९) याच्याकडे १२० रुपये, प्रकाश मारोती वाघाडे (वय २९) याच्याकडे ८० रुपये आणि संदीप दशरथ मोहुर्ले (वय २२) याच्याकडे १५० रुपये रोख आढळून आले. हे चारही आरोपी मजुरी करणारे असून ते करंजी गावचेच रहिवासी आहेत. या कारवाईत जप्त करण्यात आलेली एकूण नगदी रक्कम आणि ताश पत्ते मिळून १ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून लिफाफ्यात सीलबंद केला. या संपूर्ण कारवाईचे चित्रीकरण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘ई-साक्ष’ ॲपच्या माध्यमातून नोंदवण्यात आले आहे.

या जुगार प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळावरून पळून गेलेल्या इतर ४ आरोपींची नावे देखील निष्पन्न केली असून, यामध्ये सोनू गंगाधर मोहुर्ले, रितीक सुनील गरपल्लीवार, मयूर लक्ष्मण बामणे आणि अभिरूख किशोर बामणे (सर्व राहणार करंजी, तालुका गोंडपिपरी) यांचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळीच ताब्यात घेतलेल्या चारही आरोपींना नवीन फौजदारी कायद्यानुसार (बी.एन.एस.एस. कलम ३५-३ अन्वये) पोलीस ठाण्यात हजर राहण्याची कायदेशीर नोटीस बजावली आहे.

या प्रकरणी पोलीस अंमलदार सुनील मनोहर गव्हारे यांच्या लेखी फिर्यादीवरून गोंडपिपरी पोलीस ठाण्यात सर्व ८ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ च्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक रमेश शहाजी हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास पोलीस शिपाई अनुप मनोहरराव कवठेकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील जुगार चालकांमध्ये चांगलीच घबराट पसरली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment