चिमूर – चिमूर काँग्रेस पक्षप्रवेश कार्यक्रम उसेगाव येथे पार पडला. परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. कार्यकर्त्यांनी आमदार विजय वडेट्टीवार आणि शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. वडेट्टीवार हे काँग्रेस विधिमंडळ गटनेते आहेत. पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, या प्रवेशामुळे तालुक्यातील संघटन मजबूत होईल. प्रवेश करणाऱ्यांत अशोक कामडी, रमेश दांडेकर आणि भारत डांगे यांच्यासह इतरांचा समावेश आहे. कार्यक्रमाला तालुका काँग्रेस नेते धनराज मुंगले आणि अरुण टिपले उपस्थित होते. (१४ कोटीच्या बस स्थानकाची दयनीय अवस्था, वाचा बातमी)
चिमूर काँग्रेस पक्षप्रवेश: उसेगावात कोण सहभागी झाले?
चिमूर तालुक्यातील उसेगाव येथे काँग्रेस पक्षाला बळकटी देणारी महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली असून, परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. काँग्रेस विधिमंडळ गटनेते तथा लोकनेते आ. विजय वडेट्टीवार व युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या जनहिताच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करीत या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा हात हातात घेतला.
आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्ह्यासह चिमूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी युवा काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, शेतकरी, शेतमजूर, युवक आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांसाठी काँग्रेस पक्ष सातत्याने आवाज उठवत आहे. त्यांच्या नेतृत्वातून विकासाची नवी दिशा मिळेल, या विश्वासातून उसेगाव येथील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
या पक्षप्रवेशामुळे चिमूर तालुक्यासह उसेगाव परिसरात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार असून, आगामी काळात पक्षाला निश्चितच नवे बळ मिळेल. नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना त्यांच्या माध्यमातून गावागावांत काँग्रेसची विचारधारा आणि जनहिताची भूमिका अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास
आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष अधिक जोमाने जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करेल आणि सामान्य माणसाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा देईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. आज पार पडलेल्या पक्ष प्रवेशामध्ये अशोक कामडी, रमेश दांडेकर, भारत डांगे, अनिल चापले, देविदास चांभारे, अमृत दोडके, रामदास दोडके, विशाल दडमल, सुधाकर काशिनाथ यांचा समावेश आहे. यावेळी प्रामुख्यातील चिमुट तालुका काँग्रेस नेते धनराज मुंगले, अरुण टिपले, घनश्यामजी उपस्थित होते.
उसेगाव येथील या पक्षप्रवेशामुळे चिमूर तालुक्यात काँग्रेसच्या राजकीय वाटचालीला नवे बळ मिळाले असून, विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा वाढता विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







