मोबाइलवर बनावट बँक लिंकद्वारे सायबर फसवणूक होत असल्याचे प्रतिकात्मक दृश्य, ब्रह्मपुरी सायबर फसवणूक

लाईफ सर्टिफिकेटच्या नावाखाली निवृत्त बँक अधिकाऱ्याला १० लाख ६४ हजारांचा गंडा; ब्रह्मपुरीतील घटना

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 19, 2026

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर): ब्रह्मपुरी सायबर फसवणूक प्रकरणात तालुक्यातील ६८ वर्षीय निवृत्त बँक अधिकाऱ्याची १० लाख ६४ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. लाईफ सर्टिफिकेट अपडेट करण्याच्या नावाखाली ही फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी चंद्रपूर सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे २०२१ मध्ये बँक ऑफ इंडियातून निवृत्त झाले आहेत. ते पत्नीसह ब्रह्मपुरी येथे राहतात. (चंद्रपुरातील मानवी शीर व धड प्रकरणाचा उलगडा, वाचा बातमी)

लाईफ सर्टिफिकेट फसवणूक कशी झाली? ब्रह्मपुरी सायबर फसवणूक

ब्रह्मपुरी तालुक्यातील एका ६८ वर्षीय निवृत्त बँक अधिकाऱ्याला ‘लाईफ सर्टिफिकेट’ (जीवन प्रमाणपत्र) अपडेट करण्याच्या नावाखाली बनावट फाइल पाठवून आणि खाती हॅक करून तब्बल १० लाख ६४ हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चंद्रपूर सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर ठगांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कारु मारोती भुलाईवाले (रा. गजानन नगर, गीत पेट्रोलपंपामागे, ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर) असे फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याचे नाव असून ते २०२१ मध्ये बँक ऑफ इंडियातून निवृत्त झाले आहेत. ते आपल्या पत्नीसह ब्रह्मपुरी येथे वास्तव्यास असून दरवर्षी आपले जीवन प्रमाणपत्र अपडेट करतात, मात्र यंदा ते अपडेट करणे बाकी होते.

घटनेचा घटनाक्रम तपासता, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजेच्या दरम्यान भुलाईवाले हे त्यांच्या ‘karuji799’ या इन्स्टाग्राम आयडीचा वापर करत असताना त्यांना ‘बँक ऑफ इंडिया लाईफ सर्टिफिकेट अपडेट’ असा लोगो असलेली एक लिंक आणि त्यावर ‘09125463417’ हा टोल-फ्री क्रमांक दिसला. जीवन प्रमाणपत्र अपडेट करण्याच्या उद्देशाने त्यांनी आपल्या मोबाइलवरून त्या क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर तत्काळ ‘917908194971’ या व्हॉट्सॲप क्रमांकावरून त्यांना ‘Bank of india life certificate bin file’ नावाची फाइल पाठवण्यात आली. या फाइलवर क्लिक केल्यानंतर एक ऑनलाइन फॉर्म उघडला, ज्यामध्ये त्यांनी आपला पेन्शन खाते क्रमांक, एटीएम कार्ड क्रमांक तसेच एटीएम पिन क्रमांक भरून माहिती अपडेट केली.

अवघ्या काही मिनिटांत रक्कम वळती, ब्रह्मपुरी सायबर फसवणूक

ब्रह्मपुरी सायबर फसवणूक माहिती भरल्यानंतर जीवन प्रमाणपत्र अपडेट होण्यास ३ ते ४ तासांचा कालावधी लागेल असे दिसून आले आणि पुढे त्याच व्हॉट्सॲप क्रमांकावरून कॉल करून ७ ते ८ तास लागतील, तोपर्यंत तुम्ही इतर कामे करू शकता, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. दरम्यान, त्यांना ओटीपीसंदर्भात संदेश आले, परंतु त्यांनी ते स्वतःच डिलिट केले.

त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांच्या कालावधीत दुपारी २ वाजून ३३ मिनिटांपासून ते २ वाजून ४३ मिनिटांपर्यंतच्या वेळेत त्यांच्या बँक ऑफ इंडियाच्या पेन्शन खात्यासह इतर खात्यांमधून टप्प्याटप्प्याने रक्कम वळती करण्यात आली. यामध्ये दुपारी २:३३ वाजता ५ लाख रुपये, २:३७ वाजता २ लाख रुपये, २:४० वाजता १ लाख ९० हजार रुपये, तसेच दुपारी २:५२ ते ३:१२ वाजेदरम्यान विविध व्यवहार क्रमांकांवरून ५ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंतच्या रकमा काढून घेत एकूण १० लाख ६४ हजार रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली.

ब्रह्मपुरी सायबर फसवणूक, चंद्रपूर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

खात्यातून पैसे गेल्याचे लक्षात येताच भुलाईवाले यांनी तातडीने बँक ऑफ इंडिया गाठून आपले बँक खाते गोठवले (फ्रिज केले) आणि बँक स्टेटमेंटच्या आधारे ‘31911260255881’, ‘31911260255664’ व ‘31911260256427’ या क्रमांकांवर ऑनलाइन सायबर तक्रार नोंदवली. यानंतर १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी चंद्रपूर सायबर पोलीस ठाण्यात प्रथम खबर अहवाल (गुन्हा क्र. ०0१५/२०२६) दाखल करण्यात आला. या प्रकरणात माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(क), ६६(ड) तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम ३(५), ३१८(४), ३१९(२) आणि ३३६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुनील विठ्ठलराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

1 thought on “लाईफ सर्टिफिकेटच्या नावाखाली निवृत्त बँक अधिकाऱ्याला १० लाख ६४ हजारांचा गंडा; ब्रह्मपुरीतील घटना”

Leave a Comment