कोरपना दुचाकी अपघात घडलेल्या महामार्गावरील धुक्याचे प्रातिनिधिक छायाचित्र

धुक्याने केला घात, कोरपण्यात दोघांचा मृत्यू

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 22, 2026

कोरपना : कोरपना दुचाकी अपघातात दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. कोरपना-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कन्हाळगाव-चनई खुर्द फाट्यादरम्यान रविवारी (२२ तारखेला) पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, दाट धुक्यात अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. तिघेही सुरक्षा रक्षक कामावर जात होते. जखमीवर चंद्रपूर येथील मानवटकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (राजुऱ्यात चोरी दागिने विकले वर्धा जिल्ह्यात, गुन्हे शाखेने केली कारवाई))

कोरपना दुचाकी अपघात: नेमके काय घडले?

पहाटेच्या दाट धुक्यात कामावर जाणाऱ्या तीन सुरक्षा रक्षकांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवार दिनांक २२ रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास कोरपना-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कन्हाळगाव-चनई खुर्द फाट्यादरम्यान घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सुरक्षा रक्षकांचा मृत्यू: मृत आणि जखमींची नावे, कोरपना दुचाकी अपघात

या अपघातात प्रमोद भाऊराव किन्नाके (२६), रा. तुळशी, ता. कोरपना) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर प्रणय मुके (२८), रा. निंबाळा, ता. वणी, जि. यवतमाळ) याला गंभीर अवस्थेत चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. वैभव रमेश राऊत (२५) रा. तांबाडी, ता. कोरपना, जि. चंद्रपूर) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर चंद्रपूर येथील मानवटकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही आरसीसीपीएल लाईमस्टोन माईन्स, परसोडा येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. पहाटेच्या सुमारास तिघेही एमएच ३४ बीटी २१२० क्रमांकाच्या प्लेटिना १२० दुचाकीने कोरपना येथून कामावर जात होते. दरम्यान, परिसरात दाट धुके असल्याने दृश्यमानता कमी झाली होती. अशातच विरुद्ध दिशेने रॉंग साईडने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिघेही रस्त्यावर फेकले गेले. यात दोघांना जीव गमवावा लागला.

घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतक व जखमींना कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद रहागडाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जमादार व कोरपना पोलीस करीत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

2 thoughts on “धुक्याने केला घात, कोरपण्यात दोघांचा मृत्यू”

Leave a Comment