बल्लारपूर ट्रक अपघातात पानठेल्यावर पलटी झालेला अवजड ट्रक

बल्लारपूरमध्ये भरधाव ट्रक पानठेल्यावर पलटी; महिला आणि ग्राहक थोडक्यात बचावले!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 26, 2026

कोठारी : बल्लारपूर ट्रक अपघात फुटली दीवार वळणाजवळ गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजता घडला. भरधाव ट्रक दुभाजक ओलांडून पानठेल्यावर पलटी झाला. यावेळी तेथे उपस्थित महिला आणि ग्राहक सुदैवाने बचावले. अपघातात एक कार, दोन स्कूटी आणि पानठेल्याचे मोठे नुकसान झाले. ट्रकचालक जयसिंह ज्ञानसिंह बघेल याला किरकोळ दुखापत झाली. (वरोऱ्यात युवकाचा खून)

बल्लारपूर ट्रक अपघात; दुभाजक ओलांडून ट्रक पलटी

भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला पलटी झाल्याची भीषण घटना घडली. या अपघातात एक कार, दोन स्कूटी आणि पानठेल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेष म्हणजे, ट्रक थेट पानठेल्यावर पलटी होत असताना तेथे उपस्थित असलेली महिला आणि एक ग्राहक सुदैवाने थोडक्यात बचावले. ही घटना गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास फुटली दीवार वळणाजवळ, बल्लारपूर परिसरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘एमएच ०४ एमआर ५६३२’ क्रमांकाचा अवजड ट्रक आंध्र प्रदेशातून जम्मू-काश्मीरच्या दिशेने जात होता. दरम्यान, फुटली दीवार येथील वळणावर भरधाव वेगामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक रस्ता दुभाजक (डिव्हायडर) ओलांडून दुसऱ्या बाजूला गेला आणि जोरदार आवाज करत पलटी झाला.

पानठेल्यावर ट्रक कोसळला; महिला आणि ग्राहक बचावले, बल्लारपूर ट्रक अपघात

या भीषण अपघातात ‘एमएच ३४ सीडी ५८०९’ क्रमांकाची कार, ‘एमएच ३४ सीव्ही ५३५०’ क्रमांकाची स्कूटी, एक पानठेला तसेच ग्राहकाची आणखी एक स्कूटी ट्रकखाली दबली गेली. या धडकेत संबंधित वाहनांचे आणि पानठेल्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

अपघात घडला त्या वेळी पानठेल्यात दीपा अक्षय रामटेके ही महिला उपस्थित असून तिच्यासोबत एक ग्राहकही होता. अचानक ट्रक पानठेल्यावर कोसळल्याने दोघांच्याही जीवावर बेतले होते; मात्र सुदैवाने आणि प्रसंगावधानामुळे दोघेही या भीषण दुर्घटनेतून सुखरूप बचावले. या अपघातात ट्रकचालक जयसिंह ज्ञानसिंह बघेल (वय ५०, रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) याला किरकोळ दुखापत झाली आहे.

भरवस्तीत घडलेल्या या अपघातामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. वाहनांचे आणि पानठेल्याचे मोठे नुकसान झाले असले, तरी पानठेल्यावरील महिला आणि ग्राहक सुखरूप बचावल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या घटनेमुळे वळणावर वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

1 thought on “बल्लारपूरमध्ये भरधाव ट्रक पानठेल्यावर पलटी; महिला आणि ग्राहक थोडक्यात बचावले!”

Leave a Comment