वरोरा : वरोरा तरुणाचा खून झाल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला असून, वरोरा पोलीस ठाण्यात गणेश नागोजी बाहुरे या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आशी शिवारातील शेतात २२ वर्षीय गणेश प्रदीप काळे मृत अवस्थेत आढळला. त्याच्या शरीरावर मारहाणीचे व्रण दिसून आले. वडील प्रदीप काळे यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस तपास करत आहेत. (चंद्रपुरात बाप-लोकांवर चाकू हल्ला, वाचा बातमी)
वरोरा तरुणाचा खून: आशी शिवारात आढळला मृतदेह
शेतात कामावर जाणे बंद केल्याचा आणि जुन्या वादाचा राग मनात धरून एका २२ वर्षीय तरुणाला रात्रीतून घरातून बोलावून घेतल्यानंतर अमानुष मारहाण करून त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना वरोरा तालुक्यातील आशी शिवारात उघडकीस आली आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (वरोरा तरुणाचा खून)
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सखोल माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप बालाजी काळे (वय ४५, रा. आशी, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असून मुलगा गणेश प्रदीप काळे (वय २२) हा शेतमजुरी करत होता. गावातील गणेश नागोजी बाहुरे (रा. यशोदा नगर, पाण्याच्या टाकीजवळ, वरोरा, जि. चंद्रपूर) याने दोन वर्षांपूर्वी बालाजी गोवारदिपे यांची शेती विकत घेऊन ती ताब्यात घेतली असून तो शेतात देशी दारू विक्रीचा अवैध व्यवसाय करत होते आहे. चालू वर्षात गणेश हा गणेश बाहुरे यांच्या शेतात मजुरीला जात असे; मात्र मुलाने त्यांच्या शेतात जाऊन काम करणे वडिलांना पसंत नसल्याने त्यांनी गणेशला तेथे कामावर जाण्यास मज्जाव केला होता. त्यानंतर गणेशने बाहुरे यांच्या शेतात कामावर जाणे बंद केले होते. (वरोरा तरुणाचा खून)
वरोरा तरुणाचा खून प्रकरणी वडिलांनी व्यक्त केला संशय
याच पार्श्वभूमीवर १३ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदीप काळे शेतातून घरी परतत असताना विजू परचाके यांच्या पानठेल्यासमोरील रस्त्यावर गणेश बाहुरे हा गणेश काळे याच्याशी वाद घालून त्याला मारहाण करताना दिसला. त्यावेळी मुलाला सोडवण्यासाठी मध्ये गेलेल्या प्रदीप काळे यांनाही बाहुरेने ढकलत हातातील काठीने डोक्यावर मारून दुखापत केली होती. तेव्हापासून गणेश बाहुरे हा वडील व मुलाचा राग मनात धरून होता.
दरम्यान, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदीप काळे शेतात काम करत असताना त्यांच्या मोबाइलवर गणेश बाहुरे याचा फोन आला. त्याने विचारणा केल्यानंतर गणेश हा फवारणीच्या कामासाठी राजू नांदे यांच्या शेतात गेल्याचे वडिलांनी सांगितले; त्यावर गणेश बाहुरेने संध्याकाळी फोन करण्यास सांगितले होते. सायंकाळी ६.३० वाजता घरी आल्यानंतर प्रदीप काळे यांनी मुलाला गणेश बाहुरेचा फोन आल्याचे सांगून मोबाइल दिला. त्यानंतर गणेशने बाहुरेला फोन केला, मात्र दोघांमध्ये काय बोलणे झाले याची माहिती वडिलांना नव्हती. त्यानंतर गणेश बाहुरे हा काही वेळातच प्रदीप काळे यांच्या मोबाइलवर वारंवार फोन करत होता. रात्री ८.३० वाजता कुटुंबीयांनी एकत्र जेवण केले आणि रात्री ९ वाजताच्या सुमारास मुलगा गणेश मोबाइल घेऊन घराबाहेर पडला. (वरोरा तरुणाचा खून)
पहाटे ४ वाजता प्रदीप काळे झोपेतून उठून पाहतात तर मुलगा घरी परतलेला नव्हता. त्यानंतर सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गावातील प्रमोद झाडे यांनी राजू नांदे यांच्या मोबाइलवर फोन करून गणेश हा धनराज आशेकर (रा. वरोरा) यांच्या शेतात पडून असल्याची माहिती दिली. राजू नांदे यांनी तातडीने घरी जाऊन ही बाब प्रदीप काळे यांना सांगितली. त्यानंतर प्रदीप काळे व राजू नांदे यांनी धनराज आशेकर यांच्या आशी येथील शेतशिवारात जाऊन पाहिले असता, पराटीच्या पिकात गणेश हा मृत अवस्थेत आढळून आला. त्याच्या शरीरावर मारहाणीचे व्रण दिसून येत होते. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वरोरा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला.
१३ नोव्हेंबरचा वाद आणि २५ नोव्हेंबरची रात्र, वरोरा तरुणाचा खून
गणेश याला शेतात कामावर जाणे बंद केल्याचा तसेच जुन्या भांडणाचा राग मनात धरून, २५ नोव्हेंबरच्या रात्री ९ वाजल्यापासून २६ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजेदरम्यान वारंवार फोन करून भेटण्यास बोलावून घेतल्यानंतर धनराज आशेकर यांच्या आशी शेतशिवारात जबर मारहाण करून गणेशचा खून केल्याचा संशय फिर्यादी प्रदीप काळे यांनी व्यक्त केला आहे. या तक्रारीवरून वरोरा पोलीस ठाण्यात २६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी गुन्हा नोंदवण्यात आला असून, संशयित आरोपी गणेश नागोजी बाहुरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरोरा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







1 thought on “१३ नोव्हेंबरचा वाद आणि २५ नोव्हेंबरची रात्र; वरोऱ्यात तरुणाचा खून”