चंद्रपूर : आधार एमबीयू अपडेट वेळेत करण्याचे आवाहन चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी पालकांना केले आहे. मुलाचे वय ५ वर्षे पूर्ण झाल्यावर पहिले मॅडेटरी बायोमेट्रिक अपडेट (एमबीयू) आवश्यक असते. त्यानंतर १५ वर्षे पूर्ण झाल्यावर ते पुन्हा करावे लागते. या अपडेटमध्ये हातांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन आणि नवीन छायाचित्र नोंदवले जाते. अपडेट न केल्यास आधारशी संबंधित सेवांमध्ये अडचणी येऊ शकतात, असे प्रशासनाने म्हटले आहे. (चंद्रपूर जिल्ह्यातून चारा वाहतूक बंदी, वाचा महत्वाची बातमी)
जिल्ह्यातील २७ हजार प्रलंबित एमबीयू शाळांमधील विशेष शिबिरांतून पूर्ण करण्याचे नियोजन आहे. एमबीयू वेळेत न केल्यास आधारशी संबंधित विविध सेवांमध्ये अडचणी निर्माण होऊन आधार कार्ड रद्द देखील केले जाऊ शकते, त्यामुळे 5 ते 17 वयोगटातील मुलांचे आधार कार्ड त्वरीत अपडेट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.
आधार एमबीयू अपडेट म्हणजे काय आणि केव्हा करावे?
लहान मुलांसाठी आधार क्रमांक अतिशय महत्वाचा असून शाळेत प्रवेश, शिष्यवृत्ती, शाळेतील नोंदणी, तसेच विविध योजनांचा लाभ घेताना आधारचा वापर होत असल्याने पालकांनी आपल्या मुलाचे आधार कार्ड काढण्याबरोबरच वेळोवेळी त्यातील माहिती अपडेट ठेवून आधारचे वेळोवेळी अद्ययावतीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याचे आधार एमबीयू. मुलांच्या भविष्यातील शैक्षणिक व शासकीय कामकाजात अडथळे येऊ नयेत, यासाठी वेळीच दक्षता घेऊन एमबीयू पूर्ण करावे.
जिल्हातील एकूण प्रलंबित एमबीयूपैकी 27 हजार एमबीयू पूर्ण करण्याचे नियोजन शाळेतच विशेष शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याचा लाभ घेऊन पालकांनी आपल्या मुलांचे एमबीयू पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे. तसेच यानंतरही एमबीयू प्रलंबित असल्यास जवळच्या अधिकृत आधार केंद्रावर जाऊन प्रक्रिया पूर्ण करता येईल.
पालकांनी आपल्या मुलाच्या आधारची सद्यस्थिती अधिकृत आधार सेवांद्वारे तपासावी. एमबीयू प्रलंबित असल्यास संबंधित आधार केंद्रावर जाऊन अपडेटची आवश्यकता आहे का, याची खात्री करता येते. आधार क्रमांकाची स्थिती तपासल्यानंतर आवश्यक असल्यास तातडीने एमबीयू पूर्ण करावे. एमबीयू वेळेत न केल्यास आधारशी संबंधित सेवांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. आधारची स्थिती आणि एमबीयूची आवश्यकता पालकांनी वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे. मुलाच्या आधारचा वापर करण्यापूर्वी त्याची स्थिती सक्रिय आहे की नाही, याची खात्री करावी, असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






