चंद्रपूर – Chandrapur Azhar Sheikh Attack २५ जुलै रोजी AIMIM नगरसेवक अजहर शेख यांच्यावर काही टोळक्यांनी हल्ला केला, या हल्ल्यानंतर अजहर शेख यांनी कांग्रेस नेते सोहेल शेख यांचे नाव घेत, या हल्ल्यामागील खरे सूत्रधार असल्याचा आरोप केला, शेख यांचे आरोप सोहेल शेख यांनी फेटाळून लावले आहे. नगरसेवक अजहर शेख यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी स्वतः निषेध करतो अशी प्रतिक्रिया त्यांनी News३४ सोबत बोलताना दिली. (हे हि वाचा – चंद्रपुरात नगरसेवकावर हल्ला)
२५ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास नगरसेवक अजहर शेख हे त्यांच्या अरेबियन ताज या बिर्याणी हॉटेलमध्ये असताना टोळक्याने प्रवेश घेत वाद घातला, या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, या हल्ल्यात अजहर शेख हे जखमी झाले होते. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजहर शेख यांचे सोहेल शेख यांच्यावर गंभीर आरोप
२६ जुलै रोजी अजहर शेख यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले कि मी निवडणुकीत जिंकलो माझा विजय विरोधक पचवू शकले नाही, म्हणून माझ्यावर हल्ला करीत मला संपविण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. १५ जणांनी माझ्यावर हल्ला केला, माझ्या जीवाला काही बरेवाईट झाले तर त्याला जबाबदार हे सोहेल शेख राहणार असा आरोप त्यांनी केला, ते पुढे म्हणाले कि सोहेल शेख हे युवकांना अंमली पदार्थाचे सेवन करायला लावतात.
या प्रकरणी सोहेल शेख यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले कि अजहर शेख हे एकोरी प्रभागातील हजारो नागरिकांचे प्रतिनिधित्व करतात, त्यांच्यावर झालेला हा भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो, अशी घटना व्हायला नको. मात्र नगरसेवकानी हल्ल्यानंतर रात्री एक बयान आणि सकाळी एक बयान देत मझे नाव का घेतले हे मला समजले नाही.
माझ्या राजकीय आयुष्यात अनेक हितचिंतक आहे, त्यांच्या मनात माझ्याविषयी प्रेम असल्याने माझे नाव या प्रकरणात गोवण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे, सत्य काय ते पोलीस तपासात पुढे येणारचं. त्यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आहे, त्याचा मी निषेध करतो पोलिसांनी आरोपीना अटक करीत सत्य पुढे आणावे.
नगरसेवक अजहर शेख यांच्यावर झालेला हा हल्ला आता राजकीय रंगात रंगला आहे, या हल्ल्यामागील कारण काय ते पोलीस बाहेर काढतीलच, अनेक पक्ष या प्रकरणी आपली राजकीय पोळी भाजण्याचा देखील प्रयत्न करीत असल्याची माहिती आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






