Chandrapur Deekshabhoomi Vikas अंतर्गत साकारण्यात येणाऱ्या विकास आराखड्याची झलक

चंद्रपूर दीक्षाभूमीचा ५६ कोटींतून होणार कायापालट; विकासकामांचे होणार भूमिपूजन

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 20, 2026

चंद्रपूर – Chandrapur Deekshabhoomi Vikas प्रकल्पांतर्गत दीक्षाभूमीचे संपूर्ण रुपडे बदलणार असून लवकरच या कामाचे भूमिपूजन होणार आहे. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी पत्रकार परिषदेत या बहुप्रतिक्षित विकास आराखड्याची अधिकृत माहिती दिली. तब्बल ५६ कोटी ९० लाख रुपयांच्या निधीतून या ऐतिहासिक भूमीवर ५१ फुटी बाबासाहेबांचा पुतळा, विपश्यना केंद्र आणि थीम पार्क साकारले जाणार आहे. (सहायक पोलीस निरीक्षक म्हणतो कोण भोंगळे, धोटे? वाचा हि बातमी)

चंद्रपूर दीक्षाभूमीचे रुपडं पूर्णतः बदलणार असून याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी विकसनशील दीक्षाभूमीची झलक दाखवली. काही दिवसात दीक्षाभूमीच्या कामाचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती आमदार जोरगेवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. वर्ष २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार जोरगेवार यांनी दीक्षाभूमीच्या विकासाबाबत निधीची मागणी केली होती.

Chandrapur Deekshabhoomi Vikas : ५६ कोटी ९० लाख रुपयांच्या निधीतून भव्य प्रकल्प

जोरगेवार यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळालं आणि ५६ कोटी ९० लाख रुपयांचा निधी दीक्षाभूमीच्या विकासासाठी मंजूर झाला. दीक्षाभूमी परिसरात काय विशेष असणार आहे यावर आमदारांनी प्रकाश टाकला. दीक्षाभूमी परिसरात बाबासाहेबांचा ५१ फुटी पुतळा, कम्युनिटी हॉल, विपश्यना केंद्र, थीम पार्क, नवे विहार अशे विविध विकासकामे दीक्षाभूमी परिसरात होणार असून यामध्ये तब्बल ३ नवे प्रवेशद्वार असणार आहे.

निधी समाजकल्याण विभागाकडे आला असून वेळोवेळी तो सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार आहे, आमदार जोरगेवार यांच्या पुढाकारात कोट्यवधी रुपयांचा निधी दीक्षाभूमीसाठी मिळाल्याने भविष्यात हा परिसर पर्यटन साठी जगभरात प्रसिद्ध होणार असा विश्वास आमदारांनी यावेळी व्यक्त केला.

समाजबांधवांच्या सहकार्याने काम पूर्ण होणार

चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी आपण नेहमी प्रयत्नरत राहणार असून पुढेही अनेक कामे मार्गी लावायचे आहे ज्यामध्ये ताडोबा सफारी प्रकल्प, महाकाली मंदिर परिसराचा विकास, हेरिटेज वॉक असे अनेक कामांचा त्यांनी उल्लेख केला. सध्या दीक्षाभूमी च्या विकासकामात अडथळे आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र त्या अडथळ्याकडे लक्ष न देता, बाबासाहेबांच्या पदस्पर्श झालेल्या या दीक्षाभूमीचा विकास कसा होणार याकडे सर्व समाजबांधवांनी सहयोग करावा असे आवाहन त्यांनी केले.

दीक्षाभूमीच्या कामात काही त्रुटी दिसल्यास समाजबांधवांनी त्या लेखीस्वरूपात द्यावा प्रशासन त्या त्रुट्या दुरुस्त करणार, त्यामुळे समाजबांधवांनी या पावन भूमी परिसराच्या विकासाला सहयोग करावा असे आवाहन आमदार जोरगेवार यांनी यावेळी केले. सध्या दीक्षाभूमी बाबत जो संभ्रम पसरलेला आहे त्याबाबत आमदार जोरगेवार हे घोटेकर व खोब्रागडे कुटुंब यांची मते जाणून दीक्षाभूमी परिसरात अजून काय व्हायला हवं असे लेखी जाणून घेणार आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment