Chandrapur Ganja Seizure कारवाईत जप्त करण्यात आलेला गांजा

Chandrapur Ganja Seizure । चंद्रपुरात बाथरूममध्ये लपवलेला १ किलो गांजा जप्त

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 30, 2026

Chandrapur Ganja Seizure : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यावर पोलिसांची करडी नजर आहे, पोलीस अधीक्षकांच्या आदेशावर सध्या स्थानिक पोलीस कारवाई मोहीम राबवित आहे. कारवाईच्या या मोहिमेत २९ मे रोजी चंद्रपूर शहर पोलिसांनी १ किलो गांजा जप्त केला. (चंद्रपुरात धक्कादायक घटना, आई निघाली आरोपी)

Chandrapur Ganja Seizure कारवाईत मोठी जप्ती

२९ मे ला शहर पोलिसांना माहिती मिळाली कि २२ वर्षीय युवकाने घरातील बाथरूममध्ये गांजा आणून लपवीत त्याची विक्री करणे सुरु केले आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी बिनबा वॉर्डात धडक देत २२ वर्षीय रितिक रंजित डोंगरे च्या घरी पंचासह धाड मारली. रितिक ने घरातील बाथरूम मध्ये १ किलो २५ ग्राम गांजा प्लास्टिक पिशवीत लपवून ठेवला होता.

शहर पोलिसांनी येवले हिरव्या रंगाची पाने, फुले देठ व बिया अशी गांजा सदृश वनस्पती असा एकूण १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी रितिक डोंगरे वर अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे अधिनियम १९८५ अनव्ये कलम ८ (क), २० (ब)(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

sड्राची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलते, पोउपनि विलास निकोडे, पोलीस कर्मचारी भावना रामटेके, सचिन बोरकर, संजय धोटे, इम्रान शेख, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, कपूरचंद खरवार, रुपेश पराते, विक्रम मेश्राम, योगेश पिदूरकर, निलेश ढोक, प्रफुल भैसारे, सुशांत घिवे व दीपिका झिंगरे यांनी केली.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment