चंद्रपूर जिल्ह्यात खेत बचाओ अभियानात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी अधिकारी

चंद्रपूरसह राज्यात २२ ऑक्टोबरपासून खेत बचाओ अभियान; माती आरोग्य, नैसर्गिक शेतीवर भर

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 15, 2026

चंद्रपूर : खेत बचाओ अभियान २२ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत देशभरात राबवले जाणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातही सर्व जिल्ह्यांत अभियान होणार आहे. त्यासाठी कृषी आयुक्तालयाने विभागीय आणि जिल्हा कार्यालयांना सूचना दिल्या आहेत. जमिनीचे आरोग्य सुधारणे, खतांचा संतुलित वापर, जलसंधारण आणि नैसर्गिक शेतीचा प्रसार हा मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्तांनी केले आहे. (चंद्रपुरात दुष्काळ निवारण उपाययोजनांना प्राधान्य, वाचा महत्वाची बातमी)

अभियानाची प्रमुख उद्दिष्टे

1) माती परीक्षणावर आधारित खते व इतर कृषी निविष्ठांच्या संतुलित वापराबाबत जनजागृती, 2) तेलबिया, कडधान्ये व फलोत्पादनाद्वारे पीक विविधीकरणाला प्रोत्साहन, 3) भात पिकानंतरच्या पडीक क्षेत्राचा कार्यक्षम वापर, 4) पीक अवशेष व्यवस्थापनाला प्रोत्साहन आणि पराटी/पेंढा जाळण्यापासून शेतकऱ्यांना परावृत्त करणे, 5) सेंद्रिय/नैसर्गिक उत्पादनांच्या वापराबाबत प्रशिक्षण, 6) जनजागृती कार्यक्रम, प्रशिक्षण आणि शेतावरील प्रात्यक्षिकांद्वारे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, 7) जलसंधारण, पाण्याचे पुनर्भरण व साठवणूक याबाबत जागृती, 8) शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन.

अभियान कालावधीतील उपक्रम

अभियान काळात क्षेत्रीय पातळीवर प्रक्षेत्र भेटी, प्रशिक्षणे, शेतकरी मेळावे आदी उपक्रम आयोजित केले जातील. यामध्ये 1)माती परीक्षणावर आधारित पोषण व्यवस्थापन व मृदा आरोग्य पत्रिकेचा वापर, 2) खतांचा संतुलित वापर व खत विक्री नियमावलीबाबत जागरूकता, 3) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, 4) नैसर्गिक शेती, 5) एकात्मिक कीड व्यवस्थापन व कीटकनाशकांचा संतुलित वापर, 6) प्रति थेंब अधिक पीक, 7) पीक विविधीकरण, 8) शाश्वत शेती पद्धती, 9) शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) तयार करणे व अद्ययावत करणे, 10) प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग.

राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील कृषी कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र व आत्मा कार्यालयाशी संपर्क साधून अभियानात सक्रिय सहभाग घेऊन जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी केले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment