Chandrapur Pollution Survey दरम्यान विकास खारगे यांनी प्रदूषणग्रस्त भागांची पाहणी

चंद्रपूर प्रदूषणग्रस्त भागांची पाहणी; नुकसानभरपाई धोरणासाठी विकास खारगे यांचा सर्व्हे

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 19, 2026

चंद्रपूर – Chandrapur Pollution Survey अंतर्गत अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बेलसणी, भटाळी आणि उर्जानगर या प्रदूषणग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. कोल वॉशरीज, कोळसा उद्योग आणि प्रदूषणामुळे शेती व आरोग्यावर होणारा परिणाम जाणून घेत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसानभरपाईसाठी शास्त्रीय आणि दीर्घकालीन धोरण तयार करण्यासाठी शासन स्तरावर समिती कार्यरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. चंद्रपूरमधील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असल्याचे याआधीही विविध स्तरांवर समोर आले आहे. (कंत्राटी कर्मचाऱ्यांना धानोरकरांनी दिला दिलासा)

चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा उद्योग तसेच कोल वॉशरीजमुळे निघणारी धूळ, हवेतील धुळीचे कण, कोल वॉशरीतून निघणा-या प्रदुषित पाण्याचा मानवी जीवनावर तसेच शेतीव्यवसायावर होणारा परिणाम प्रत्यक्षरित्या जाणून घेण्यासाठी अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी आज (दि. १९) चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी बेलसणी, भटाळी, उर्जानगर या प्रदूषण ग्रस्त भागाची पाहणी करून पिडीत शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम, उपजिल्हाधिकारी अतुल जटाळे, तहसीलदार विजय पवार यांच्यासह संबंधित अधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते.

Chandrapur Pollution Survey दरम्यान कोणत्या भागांची पाहणी?

शासनामध्ये काम करतांना धोरण, नियम, कायदा असणे महत्वाचे आहे, असे सांगून अपर मुख्य सचिव श्री. खारगे म्हणाले, प्रदुषणामुळे होणा-या शेतीच्या नुकसानभरपाईबाबत शासनाचे अधिकृत धोरण अथवा कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण करण्यात आले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज चंद्रपूर येथे आलो. विशेष म्हणजे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी, मोठ्या प्रमाणात होणा-या प्रदुषणाचा तसेच शेतीच्या नुकसानभरपाईचा मुद्दा  शासनाकडे मांडला. त्यांच्याच प्रयत्नामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी एक दीर्घकालीन धोरण तयार होत आहे.

उद्योगांच्या प्रदुषणामुळे या क्षेत्रात समस्या नक्कीच आहे, शेतीचे नुकसान होत आहे, ही नुकसानभरपाई कोणी द्यायची, कोणत्या दराने द्यायची, कधीपर्यंत द्यायची, याबाबत शास्त्रीय पध्दतीने निर्णय घेण्यासाठी कृषी व महसूल विभागाचे अधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ तसेच नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) प्रतिनिधींची नियमितपणे बैठक घेण्यात येईल. चर्चा व अभ्यास करून शेतीच्या नुकसानभरपाईबाबत एक निश्चित धोरण तयार करून शासनाला अहवाल सादर केला जाईल. पिडीत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी वस्तुनिष्ठ पध्दतीने ही समिती काम करेल, अशी ग्वाही अपर मुख्य सचिव श्री. खारगे यांनी दिली.

उद्योगांपेक्षा अन्न पिकविणा-या शेतक-यांचे महत्व जास्त : आमदार सुधीर मुनगंटीवार

यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, उद्योगांच्या प्रदुषणामुळे शेतीचे तसेच नागरिकांच्या आरोग्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. उद्योगांपेक्षा अन्न पिकविणा-या शेतक-यांचे महत्व जास्त आहे. अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली शेतीच्या नुकसानभरपाई करीता शासनाने समिती गठीत केली आहे. विकास खारगे हे अभ्यासू, निष्ठावंत, संवेदनशील तसेच प्रामाणिक अधिकारी आहे. त्यांच्या माध्यमातून एक चांगला अहवाल शासनाला सादर करण्यात येईल, जेणेकरून नागरिकांना त्याचा फायदा अनेक वर्षे होत राहील. या अहवालात शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीचे धोरण (एमएसपी) अंतर्भुत असावे. एमएसपी बदलला तर नुकसानभरपाईची रक्कम वाढेल, असे आमदार श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतीचे नुकसान, गावाचे पुनर्वसन, नोकरीत स्थानिकांना रोजगार, उद्योगासाठी शेतजमिनीचा योग्य भाव, आदी विषयांबाबत माहिती दिली.

 या ठिकाणी दिल्या भेटी : या दौ-यात अपर मुख्य सचिव श्री. खारगे यांनी बेलसणी येथील महामाया कोल वॉशरीज मुळे होणारे प्रदुषण, भटाळी येथील वेकोलीच्या ओव्हर बर्डनमुळे होणारा पुराचा धोका तसेच उर्जानगर येथील रोप-वे मुळे होणा-या प्रदुषणाची पाहणी केली.

विविध विषयांबाबत आढावा बैठक : श्री. खारगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागाशी संबंधित विषयांवर आढावा बैठक घेतली. यात नवीन गंगापूर (ता. पोंभुर्णा) महसूली दर्जा प्रदान करून संगणीकृत गाव नमुना सातबारा उपलब्ध करून देणे, मौजा पाहमी (ता. चंद्रपूर) हे गाव ग्रामपंचायत निंबाळाला जोडणे, झरी व पेठ ही गावे पिंपळखुट ग्रामपंचायतीला जोडणे, देवाडा व जुनोना ही गावे चंद्रपूर तालुक्यात समाविष्ट करणे या विषयांवर गावक-यांशी व संबंधित अधिका-यांशी चर्चा करण्यात आली.

यावेळी आमदारद्वय सुधीर मुनगंटीवार, देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह आदी उपस्थित होते.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment