चंद्रपूर – Chandrapur Raksha Bandhan अंतर्गत गांधी चौकातील कष्टकरी बांधवांसोबत अनोखा राखी उत्सव साजरा करण्यात आला. आमदार सुधीर मुनगंटीवार मित्र परिवारातर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. महापौर संगीता खांडेकर यांनी स्थानिक फळ विक्रेत्याला राखी बांधून महोत्सवाचे उद्घाटन केले. बाजारातील हमाल, ऑटो चालक आणि विक्रेत्यांना राख्या बांधण्यात आल्या.
भाजप नेत्या नम्रता आचार्य-ठेमस्कर यांच्या संकल्पनेतून हा एक आठवड्याचा उत्सव सुरू झाला आहे. महिला पदाधिकाऱ्यांनी सर्वांना शुभेच्छा पत्र देऊन सणाचा आनंद द्विगुणित केला. (हे हि वाचा – आरोपीला वाचवण्यासाठी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र)
रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणींचे पवित्र नाते. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाचे एक महत्व असते. तसेच राखी या सणात बहिन भावाला राखी बांधते आणि आपले प्रेम आपल्या भावाप्रति दर्शवते. त्याच आधारे राखीपोर्णिमेच्या निमित्ताने आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार मित्र परिवारा तर्फे गांधी चौकातील कष्टकऱ्यांना राखी बांधून महिला भगिनींनी राखी उत्सवाला सुरवात केली.
या राखी उत्सवाचे उदघाटन महापौर संगीता खांडेकर यांनी केले. त्यांनी स्थानिक फळ विक्रेत्याला राखी बांधून आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या तर्फे शुभेच्छा पत्र देऊन या महोत्सवाचे उद्घाटन केले. त्यांनतर सुधीर भाऊ मुनगंटीवार मित्र परिवारातील महिला सदस्यांनी संपूर्ण बाजारातील भाजी विक्रेते, फळ विक्रेते, हमाल, धान्य विक्रेते, फुल विक्रेते, ऑटो चालक इतर दुकानदार यांना राख्या बांधून शुभेच्छा पत्र दिले. यावेळी कष्टकरी बांधवानी सुद्धा उत्साहात या उपक्रमाला प्रतिसाद दिला.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या नम्रता आचार्य-ठेमस्कर यांच्या संकल्पनेतून हा राखी उत्सव साजरा करण्यात आला, असून वेगवेगळ्या समाज घटकातील लोकांना लोकांना राख्या बांधून हा उत्सव एक आठवडा चालवणार असल्याची माहिती नम्रता आचार्य-ठेमस्कर यांनी दिली. यावेळी महानगरपालिका सभागृह नेत्या जयश्री जुमडे, नगरसेविका सुनीता जयस्वाल, नगरसेविका सविता सरकार, माला माणिकपुरी, सीमा धुर्वे, हीना शेख, शीतल आत्राम, सिंधू राजगुरे, संगीता बावने, शुभांगी दिकोंडवार,नाझीरा सय्यद, शर्मीली मिश्रा, सपना तेलतुंबडे, कोणिका सरकार,रुपाली आंबटकर,आशा उके, आशा सरपाते, बसंती जयस्वाल यांची उपस्थिती होती.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






