Chandrapur Road Digging मुळे चंद्रपूर शहरातील खोदकामग्रस्त रस्त्यांचे दृश्य

चंद्रपूर शहरात अमृत व सिव्हरेज खोदकामांमुळे नागरिक त्रस्त; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 4, 2026

चंद्रपूर – (Chandrapur Road Digging) चंद्रपूर शहरात अमृत पाणीपुरवठा व सिव्हरेज योजनेच्या खोदकामांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर चिखल, पाणी साचणे आणि अपघाताचा धोका वाढल्याने शिवसेनेने महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. (पावसामुळे बाबुपेठ मधील असंख्य घरात शिरले पाणी)

चंद्रपूर शहरात अमृत पाणीपुरवठा योजना व सिव्हरेज योजनेअंतर्गत सुरू असलेल्या खोदकामांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवर चिखल, पाणी साचणे, वाहतुकीस अडथळे निर्माण होणे तसेच अपघातांचा धोका वाढल्याने शिवसैनिकांच्या वतीने चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.

Chandrapur Road Digging मुळे नागरिकांना कोणत्या अडचणी?

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील अनेक भागांमध्ये खोदकाम करूनही संबंधित कंत्राटदारांकडून भराव, काँक्रीटीकरण व रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.

तसेच, पूर्वी करण्यात आलेल्या सर्व खोदकामांच्या ठिकाणी तातडीने भराव, काँक्रीटीकरण व आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे आदेश संबंधित कंत्राटदारांना देण्यात यावेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतरच नवीन खोदकामांना परवानगी द्यावी. तसेच पावसाळा संपेपर्यंत शहरातील नवीन खोदकामांना तात्पुरती स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेचा व जनहिताचा विचार करून प्रशासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी शिवसैनिक ललित ओमप्रकाश कासट, चंदन दादा पॉल, कुमार दादा, कुमार भैया जुनमलवार, प्रशांत रोहनकर, बबलू मेश्राम, मिलिंद उपग नलवार, कुलदीप सिंह मिर्दा, संतोष सोनकर व तन्मय पाचघरे उपस्थित होते.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment