चंद्रपूर – Chandrapur Stray Cattle Action अंतर्गत मनपा प्रशासनाने शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी धडक मोहीम सुरू केली आहे. रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या ४८ गायी व म्हशी पकडून त्यांची प्यार फाऊंडेशनच्या गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे. जनावरांच्या मालकांवर थेट गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा मनपाने दिला आहे. (हे हि वाचा – १५ दिवसांचे आश्वासन ४८ तासात पूर्ण)
मोकाट जनावरे शहरातील मुख्य तसेच इतर मार्गांवर, रस्त्यांवर ठाण मांडून बसून राहात असल्याने वाहनधारकांचा अपघात होण्याची शक्यता अधिक असते. याबाबत मनपातर्फे यापुर्वीही कारवाई करून जनावरांच्या मालकांना समज देण्यात आली आहे.समज दिल्यानंतर काही काळ ते आपल्या जनावरांवर लक्ष देऊन ते रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेतात,मात्र त्यानंतर पुन्हा जनावरांना मोकाट सोडुन देण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने मनपातर्फे कारवाई करण्याची सुरवात करण्यात आली आहे.
मागील महिन्यापासुन मनपाच्या पथकाने नागपूर रोड, राष्ट्रवादी नगर, तुकूम, बंगाली कॅम्प, बागला चौक, गांधी चौक बाजार,दाताला रोड रामसेतु इत्यादी परिसरात कारवाई करत मोकाट असलेली ४८ जनावरे पकडण्यात आली आहे. त्यांची रवानगी प्यार फाऊंडेशन येथे करण्यात आली. सर्व मोकाट जनावरांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार असुन जनावरांच्या मालकांकडुन प्रति जनावर १ हजार रुपये दंड तसेच गोशाळेत जनावरांची रवानगी केल्यानंतर प्रति दिवस प्रति जनावर ७०० रुपये गोशाळा शुल्क सुद्धा आकारण्यात येणार आहे. सदर शुल्क भरल्यानंतरच मालकांना त्यांची जनावरे परत मिळु शकणार असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






