चंद्रपूर : वडगावची महाराणी या संकल्पनेतून चंद्रपुरातील गायत्री नगर शारदोत्सव मंडळ यंदा नवरात्रीचा देखावा साकारत आहे. वडगाव परिसरातील या मंडळाने १८ महाशक्तिपीठे आणि केदारेश्वर गुंफा मंदिर यांवर आधारित मांडणी केली आहे. मंडळाच्या माहितीनुसार, भारतीय संस्कृती आणि देवीभक्तीची ओळख नव्या पिढीला करून देणे, हा उद्देश आहे. मंडळात सात संस्थापक सदस्य कार्यरत आहेत. अध्यक्ष तारकेश येनुरकर आणि सचिव सारंग कलास्कर यांच्यासह कार्यकारिणीने तयारी सुरू केली आहे. परिसरातील नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (चंद्रपुरात ९ हजार ९९९ कन्यांचे पूजन, वाचा बातमी)
वडगावची महाराणी : १८ महाशक्तिपीठे आणि केदारेश्वर गुंफा देखावा
शहरातील गायत्री नगर, वडगाव परिसरातील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेला प्रोत्साहन देण्यासाठी यंदाच्या नवरात्रोत्सवात ‘वडगावची महाराणी’ या अनोख्या संकल्पनेतून एक अत्यंत आकर्षक व भक्तिमय देखावा साकारण्यात येणार आहे. गायत्री नगर शारदोत्सव मंडळाच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, यंदाच्या महोत्सवात १८ महाशक्तिपीठे आणि पवित्र केदारेश्वर गुंफा मंदिराच्या पौराणिक व धार्मिक महत्त्वावर आधारित विशेष देखाव्याची मांडणी केल्या गेली आहे.
भारतीय संस्कृती, देवीभक्ती आणि आपल्या प्राचीन धार्मिक परंपरांचा समृद्ध परिचय नवीन पिढीला व नागरिकांना करून देणे, तसेच नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वावर समाजात भक्ती, श्रद्धा आणि सलोख्याचा सामाजिक एकोपा जपणे, हा या संपूर्ण उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. मंडळाची ही ‘वडगावची महाराणी’ संकल्पना यंदा भाविकांसाठी आणि शहरवासीयांसाठी प्रमुख आकर्षण ठरणार यात शंका नाही.
गायत्री नगर शारदोत्सव मंडळाचे सात संस्थापक सदस्य
या भव्य उत्सवाच्या यशस्वी नियोजनामागे सात संस्थापक सदस्यांचे विशेष योगदान आहे. त्यांनी एकत्रित पुढाकार घेऊन गायत्री नगर शारदोत्सव मंडळाची स्थापना केली असून, विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांमध्ये एकतेची भावना दृढ करण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. या सात सदस्यांच्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी श्री. तारकेश येनुरकर, उपाध्यक्षपदी श्री. रितेश खाडे, कोषाध्यक्षपदी श्री. अद्वैत भडके, तर सचिव म्हणून श्री. सारंग कलास्कर जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच, याशिवाय श्री. देवेंद्र भोज, श्री. अनिकेत येनुरकर आणि श्री. सुनील राजुरकर हे सदस्य म्हणून या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.
या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि परिसरातील नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा नवरात्रोत्सव अत्यंत भव्य, दिव्य, भक्तिमय आणि संस्मरणीय करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. ‘वडगावची महाराणी’च्या माध्यमातून भक्ती, समृद्ध परंपरा आणि भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम चंद्रपूरकरांना अनुभवता येणार असून, या धार्मिक व सामाजिक उपक्रमासाठी परिसरातील तमाम नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






