Chandrapur Water Crisis दरम्यान चंद्रपूर शहरातील महिलांनी पाणीटंचाईविरोधात महानगरपालिकेकडे निवेदन देतानाचे दृश्य

Chandrapur Water Crisis | शिवसेनेचे निवेदन; तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 19, 2026

Chandrapur Water Crisis : चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील बाजार वॉर्ड, गंजवॉर्ड, बालाजी वॉर्ड, पठाणपुरा, बाबूपेठ, भानापेठ, हॉस्पिटल वॉर्ड, एकोरी वॉर्ड, महाकाली वॉर्ड, जलनगर वॉर्ड, बिनबागेट वॉर्ड, रामनगर, दादमहल वॉर्ड, गौतम नगर, समाधी वॉर्ड, कोतवाली वॉर्ड, दादमहल परिसर, विठ्ठल मंदिर वॉर्ड, अंचलेश्वर गेट परिसर, ताडबन परिसर तसेच भिवापूर परिसरांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (मान्सूनपूर्व नाले सफाई करा, कांग्रेसचे निवेदन)

अनेक भागांमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असून काही ठिकाणी अजूनही नियमित पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. मागील दोन वर्षांपासून अमृत योजनेअंतर्गत केवळ पाईपलाईन व मीटर बसविण्याचे काम करण्यात आले, मात्र नागरिकांच्या नळाला आजही पाणी येत नसल्याने महिलांना ४६°कं च्या कडक उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. Chandrapur Water Crisis

चंद्रपूर शहरातील विविध वॉर्डांमध्ये Chandrapur Water Crisis ची तीव्रता वाढली

या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने मा. आयुक्त अकलूरी नरेश यांना निवेदन देत तातडीने नियमित व अखंडित पाणीपुरवठा सुरू करावा, टँकरद्वारे पाणीपुरवठा वाढवावा तसेच अमृत जल योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी, अशी मागणी करण्यात आली. 

 शिवसेना जिल्हाप्रमुख अॅड. युवराज धानोरकर यांच्या आदेशाने नगरसेविका डीलन केळझरकर, युवासेना जिल्हाप्रमुख शैलेश केळझरकर, गोमती पाचभाई, अॅड. मृणालिनी रागीट, गीता माहुलकर, मेघा आक्केवार, सीमा मेश्राम, संतोषी कादलवार, महेश पाटील, कार्तिक डोनीवार व वीरेन  वाटकर यांच्या उपस्थित निवेदन देऊन तातडीने उपाययोजना न झाल्यास चंद्रपूर शहरातील महिला महानगरपालिकेच्या नळांवर येऊन “पाणी हक्क उठाव” करतील, असा इशाराही देण्यात आला.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment