Lcb burglary action in Chandrapur showing police arrest and cash recovery⁠

चंद्रपूरमधील ६ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश, आरोपी छत्तीसगडमधून जेरबंद! 

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 31, 2026

चंद्रपूर – Lcb burglary action in Chandrapur⁠ चंद्रपूर शहरात बसस्थानक परिसरातील एका कार्यालयातून सहा लाख रुपयांची रोकड लांबविणाऱ्या घरफोडी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने छत्तीसगड राज्यातून जेरबंद करण्यात यश मिळवले असून, त्याच्याकडून तीन लाखांची चोरीची रोकड जप्त करण्यात आली आहे. चंद्रपूर येथील डी.एस.के. ग्रीन कॉलनी, दाताळा येथील फिर्यादी सौ. राकेश अवघडे यांच्या बस स्टँडजवळील पॅलेस हॉटेलमागच्या ऑफिसमधून अज्ञात चोरट्याने सहा लाख रुपये रोख चोरल्याची तक्रार रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती, ज्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहिती

या गंभीर गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी विशेष तपास पथक तयार केले होते. या पथकाने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती व कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील रेंगाकठेरा येथील संशयित आरोपी वलेश कुमार हल्बा उर्फ बुवारिया याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.  

आरोपीने चौकशीदरम्यान २७ जुलै २०२६ रोजी चंद्रपूर शहरातील बसस्थानक परिसरातील कार्यालयातून ६ लाख रुपयांची चोरी केल्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून ३ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. उर्वरित रकमेचा शोध घेतला जात असून आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही धडक कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment