चंद्रपूर : Savali Minor Girl Missing प्रकरणाने सावली तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. तालुक्यातील एका गावातून १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाली आहे. (हे हि वाचा – बॉम्बने उडवून देईन, डॉक्टरला धमकी)
२९ जुलैच्या मध्यरात्री ही घटना घडली असून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय आहे. सावली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नक्की काय घडली घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीचा इशारा असल्याने २९ जुलै रोजी शाळांना सुट्टी होती. त्यामुळे मुलगी दिवसभर घरीच होती. रात्री १० वाजताच्या सुमारास घरातील सर्व सदस्य जेवण करून झोपले. रात्री १ वाजेच्या सुमारास घरातील एका सदस्याला जाग आली असता, मुलगी तिच्या खाटेवर दिसून आली नाही.
कुटुंबीयांनी तात्काळ संपूर्ण गावात व परिसरात शोध घेतला, तसेच जवळच्या नातेवाइकांशी संपर्क साधला; मात्र मुलीचा कुठेही पत्ता लागला नाही. आसपासच्या अनेक गावांमध्ये शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने, अखेर कुटुंबीयांनी सावली पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
मुलीचे वर्णन व पोलिसांचे आवाहन
पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता मुलगी सुमारे १५७ सेमी उंचीची, सावळ्या रंगाची, सडपातळ बांध्याची आणि लांब काळ्या केसांची आहे. तिने अंगात काळ्या रंगाचा सलवार-कुर्ता आणि पायात काळ्या रंगाची सँडल घातलेली आहे. तिच्या उजव्या गालावर तिळ आहे.
सावली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन देऊरकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अशा वर्णनाची मुलगी आढळल्यास अथवा याबाबत काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा सावली पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






