बल्लारपूर (चंद्रपूर): Ballarpur Missing Girl News बाबत मोठी बातमी समोर येत आहे. बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १७ वर्षांची अल्पवयीन मतिमंद मुलगी मध्यरात्री अचानक बेपत्ता झाली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञाताने फुस लावून तिला पळवून नेल्याचा संशय आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (हे हि वाचा – बाबुपेठ मध्ये रक्तरंजित थरार)
Ballarpur Missing Girl News आणि पोलिसांची कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, वस्ती परिसरातील रहिवासी असलेल्या कुटुंबाची १७ वर्षीय मुलगी जन्मापासूनच मतिमंद असून तिला स्पष्टपणे बोलता येत नाही. मुलीला मागील वर्षी भद्रावती येथील मतिमंद मुलांच्या शाळेत प्रवेश देण्यात आला होता, परंतु गेल्या काही दिवसांपासून ती पुन्हा भद्रावती येथील शाळेत जाण्याचा हट्ट करत होती. ती नेहमी घराच्या आजूबाजूला आणि रात्रीच्या वेळी पाणी भरण्यासाठी विहिरीवर फिरत असायची.
घटना घडली त्या रात्री सर्व कुटुंब जेवण करून झोपले होते. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा तिच्या आईला जाग आली, तेव्हा मुलगी तिच्या अंथरुणावर दिसून आली नाही. त्यांनी तात्काळ पतीला उठवून परिसरात आणि संपूर्ण गावात तिची शोधाशोध सुरू केली. नातेवाईकांकडे विचारपूस करण्यासोबतच रेल्वे स्टेशन आणि बस स्थानक परिसर पिंजून काढला, मात्र तिचा कुठेही सुगावा लागला नाही.
अल्पवयीन मुलगी स्वतःहून कुठेही न सापडल्याने, तिला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची पक्की खात्री कुटुंबाला झाली. त्यानंतर त्यांनी तात्काळ बल्लारपूर पोलीस ठाणे गाठून संपूर्ण घटनेची माहिती दिली व तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे बल्लारपूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १३७(२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बेपत्ता मुलीचे वर्णन ५.२ फूट उंची, लांबट चेहरा, सावळा रंग, बळकट बांधा आणि लांब काळे केस असे आहे. घटनेच्या वेळी तिच्या अंगात निळ्या रंगाची कुर्ती होती तसेच तिच्या डाव्या नाकात सोन्याची नथ आणि दोन्ही कानांत चांदीचे बारी आहेत. पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






