Majri Murder प्रकरणातील घटनास्थळाचे प्रतीकात्मक दृश्य

खळबळजनक Majri Murder?; स्मशानभूमीजवळ 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 3, 2026

Majri Murder : माजरी – माजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटाळा गावालगत असलेल्या स्मशानभूमीजवळ एका २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह अत्यंत गंभीर अवस्थेत आढळून आल्याने परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी (२ जून) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. प्राथमिक अंदाजानुसार, मृतदेहावर मारहाणीच्या गंभीर खुणा असल्याने हा पूर्ववैमनस्यातून केलेला खून असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. (चंद्रपुरातील तंबाखू माफियांवर मकोका)

नदीवरून परतणाऱ्या भाविकांना दिसला मृतदेह

अधिक मास निमित्त काही भाविक वर्धा नदीपात्रात स्नानासाठी गेले होते. स्नान आटोपून पाटाळा गावाकडे परत येत असताना, स्मशानभूमीजवळ त्यांना एका तरुणाचा मृतदेह पडलेला दिसला. मृताच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जबर मारहाण करण्यात आली असून, तोंड फुटलेल्या व चेहरा सुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पाटाळा गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विनोद वाटेकर यांनी तातडीने माजरी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचांसमक्ष पंचनामा केला.

वरोरा तालुक्यातील तरुणाची ओळख पटली

पोलीस तपासात मृताची ओळख आकाश बाबाराव जरीले (वय २५, रा. शेंबळ, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) अशी पटली आहे. आकाश हा स्थानिक कॉलवॉशरीमध्ये कामाला होता. घटनेच्या दिवशी तो सचिन पाचभाई, राहुल जिवतोडे, विनोद घागी आणि विठ्ठल पाचभाई या आपल्या मित्रांसोबत वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेला होता, मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही. दरम्यान, सोशल मीडियावरील व्हॉट्सॲप मेसेज पाहून मृताचा भाऊ विकास बाबाराव जरीले (रा. गोरजा, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) याने तातडीने घटनास्थळ गाठले.

पोलीस तपास सुरू Majri Murder

या धक्कादायक प्रकरणाची माजरी पोलिसांनी मर्ग क्रमांक १०/२०२६ अन्वये नोंद केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी उपविभागीय रुग्णालय, वरोरा येथे पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सध्या सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमित पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हरिदास चोपणे, पोलीस उपनिरीक्षक हरिचंद्र देऊळकर व माजरी पोलीस पथक करीत असून संशयितांचा शोध घेतला जात आहे.

शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार असून पोलिस तपासाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment