चंद्रपूर : मुल नागपूर बससेवा २९ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू झाली आहे. यामुळे मुल तालुक्यातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील मोठी अडचण दूर झाली आहे. विद्यार्थी, रुग्ण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा होणार आहे. ही सेवा बंद असल्याने अनेक दिवस गैरसोय होत होती. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र दिले होते. त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून सेवा सुरू करण्याची विनंतीही केली. आता नागपूर आणि उमरेड डेपोतून वाढीव सेवाही सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुल नागपूर बससेवा २९ सप्टेंबरपासून सुरू
परिवहन मंत्री ना. प्रतापजी सरनाईक आणि परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मा. श्री. संजयजी सेठी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केल्यानंतरही ते केवळ पत्रव्यवहारावर थांबले नाहीत; परिवहन मंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीने सेवा सुरू करण्याची विनंती केली, तसेच आपल्या स्वीय सहाय्यकांना विभाग नियंत्रकांकडे पाठवून प्रत्यक्ष विभागीय पातळीवर पाठपुरावा केला. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित म्हणून आज, २९ सप्टेंबरपासून मुल-नागपूर बससेवा सुरू झाली असून, अनेक दिवसांच्या गैरसोयीनंतर मुलवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. (चंद्रपूर जिल्ह्यात १ ऑक्टोबररोजी १ दिवस एकसाथ, वाचा हि बातमी)
परिवहन मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी आणि पाठपुरावा
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी परिवहन मंत्री ना. प्रतापजी सरनाईक तसेच परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मा. श्री. संजयजी सेठी यांच्याकडे पत्राद्वारे मुल-नागपूर बससेवा तातडीने सुरू करण्याची ठाम मागणी केली होती. ही सेवा बंद झाल्याने विद्यार्थी, रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विविध कामांसाठी नागपूरला जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. काही वर्षांपूर्वी या मार्गावर एसटीच्या दिवसभरात सुमारे १५ फेऱ्या होत होत्या, याचा संदर्भ देत मुल- नागपूर बससेवा ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनाची गरज असल्याचेही आ. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष म्हणजे केवळ पत्र देऊन थांबले नाही. परिवहन मंत्री ना. प्रतापजी सरनाईक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत ही सेवा तातडीने सुरू करण्याची विनंती त्यांनी केली. त्यानंतर आपल्या स्वीय सहाय्यकांनाही विभाग नियंत्रकांकडे पाठवून प्रत्यक्ष विभागीय पातळीवर पाठपुरावा केला. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नासाठी ‘पत्र दिले आणि विषय संपला’ अशी भूमिका न घेता, निर्णय प्रत्यक्ष जमिनीवर उतरेपर्यंत पाठपुरावा करण्याची आ. सुधीर मुनगंटीवार यांची कार्यशैली पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या पत्रात मुल शहराचे भौगोलिक, सामाजिक, शैक्षणिक आणि व्यापारी महत्त्व स्पष्ट करत नागपूरशी थेट एसटी बससेवा उपलब्ध नसणे ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित गंभीर समस्या असल्याचे नमूद केले. विद्यार्थी, रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसह विविध घटकांना या बससेवेचा मोठा आधार मिळत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे मुलवासीयांना आता नागपूरच्या दिशेने प्रवासासाठी पुन्हा सार्वजनिक वाहतुकीचा विश्वासार्ह पर्याय उपलब्ध झाला आहे. विशेषतः उपचार, शिक्षण, रोजगार, व्यवसाय तसेच विविध शासकीय आणि सामाजिक कामांसाठी नागपूरला जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय या सेवेमुळे दूर होणार आहे.
विद्यार्थी, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा
मुल तालुक्याला कर्मवीर मा.सा. कन्नमवार यांचा ऐतिहासिक वारसा लाभला असून, या भागातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा आणि नागपूरशी असलेली वाढती प्रवासाची गरज लक्षात घेऊन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वाहतूक सुविधांनाही विशेष प्राधान्य दिले आहे. मुल- नागपूर बससेवा सुरू झाल्यानंतर आता उमरेड आणि नागपूर डेपोमधून नागपूर–मुल वाढीव बससेवा सुरू करण्यासाठीही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून, ही सेवाही लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे मुल तालुक्यातील नागरिकांना नागपूरकडे ये-जा करण्यासाठी अधिक सुलभ आणि नियमित सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे
मुलवासीयांनी या बससेवेसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानताना, नागरिकांच्या अडचणीला स्वतःची जबाबदारी मानून त्यासाठी शासनस्तरापासून विभागीय पातळीपर्यंत सातत्याने पाठपुरावा करणारी आ.मुनगंटीवार यांची कार्यपद्धती पुन्हा एकदा अनुभवास आल्याचे सांगितले. लोकांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेला छोटासा प्रश्न असो किंवा मोठ्या विकासकामाचा विषय तो मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा करण्याची त्यांची ही भूमिका त्यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीची ठळक ओळख ठरत आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






