नाकाबंदीत मोठा उलगडा: देऊळगाव फाट्यावर बोलेरो अडवली अन् पोलिसांना जे दिसलं, त्याने सगळेच हादरले!

February 02, 2026 by Prakash Hande

ब्रह्मपुरी - चंद्रपूर जिल्ह्यात कत्तलीकरिता गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर चंद्रपूर पोलिसांची कारवाई मोहीम सुरु आहे, या मोहिमेत ब्रह्मपुरी पोलिसांनी कारवाई करीत ४ गोवंशाची सुटका करीत एकूण ४ लक्ष ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करीत दोघांवर गुन्हा दाखल केला. (पोंभुर्णा पोलिसांनी उधळला कत्तलीचा कट)

ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील देऊळगाव फाट्याजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली असता महिंद्रा बोलेरो वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये ४ मग गोवंश जनावरे कत्तलीकरिता नेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी गजानन श्रीराम गडदे राहणार खेर्डा जिल्हा हिंगोली, अरविंद नानाजी बुल्ले राहणार देउगाव यांच्यावर गुन्हे दाखल करीत अटक करण्यात आली.या कारवाईत ४ गोवंशीय जनावरे सह चारचाकी वाहन असा एकूण ४ लक्ष ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी मुकेश गजबे, वशिष्ठ रंगारी, प्रवीण भिवगडे, निलेश तुमसरे, इर्शाद खान व स्वप्नील पळसपगार यांनी केली.   

 

Leave a Comment

+