Ashok Kharat CDR । नाशिकमध्ये मोठा स्फोट! खरातच्या CDR मध्ये मंत्र्यांची नावे? अंजली दमानियांचा दावा

April 03, 2026 by Prakash Hande

महाराष्ट्र वार्ता - नाशिकमध्ये स्वतःला बाबा म्हणून सादर करणाऱ्या अशोक खरात याच्याविरोधात गंभीर आरोप समोर येत असून, प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनत आहे. महिलांचे शोषण आणि आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित अनेक बाबी उघडकीस येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. (अशोक खरात महिलांना केबिनमध्ये काय पाजायचा)

 

सामाजिक कार्यकर्त्या Anjali Damania यांनी या प्रकरणात महत्त्वाचे खुलासे करत अशोक खरातचा कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आपल्या हाती लागल्याचे सांगितले. त्यांनी ही माहिती पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे दिल्याचेही स्पष्ट केले.

 

या CDRनुसार विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचे अशोक खरातशी संपर्क असल्याचा दावा करण्यात आला आहे. Rupali Chakankar यांनी खरात यांना आपले गुरु मानले होते, तसेच त्यांच्यात मोठ्या प्रमाणात संवाद झाल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे प्रतिभा चाकणकर यांच्याशीही मोठ्या प्रमाणात कॉल्स झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचेही काही कॉल्स खरात यांना झाल्याचा दावा करण्यात आला असून, त्यामध्ये इनकमिंग व आऊटगोईंग कॉल्सचा समावेश असल्याचे सांगितले गेले. तसेच Chandrakant Patil, Sunil Tatkare आणि Ashish Shelar यांच्यासोबतही संपर्क झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

 

अंजली दमानिया यांनी सांगितले की, १ एप्रिल २०२५ ते १७ मार्च २०२६ या कालावधीतील कॉल रेकॉर्ड त्यांच्या हाती लागला असून, या काळात सर्वाधिक वेळ संवाद करणाऱ्यांमध्ये तृप्ती खरात आणि रुपाली चाकणकर यांची नावे पुढे आली आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. Rupali Chakankar CDR

यासोबतच आर्थिक गैरव्यवहाराचेही धक्कादायक तपशील समोर आले आहेत. कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेत अनेक खात्यांमध्ये अशोक खरात याचे नाव नॉमिनी म्हणून जोडले गेले असून, या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती आहे. काही खात्यांचा संबंध खरात कुटुंबीयांशी असल्याचेही सांगितले जाते.

 

या सर्व प्रकरणामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी अधिकृत चौकशीची गरज असल्याची मागणी जोर धरत आहे.

Leave a Comment

+