Ballarpur Sword Case : चंद्रपूर (बल्लारपूर) - मित्राचा वाढदिवस आणि जल्लोष, त्या जल्लोषात काही अल्पवयीन व तरुण मुलांनी हातात तलवार घेत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये बर्थडे बॉय सह गुन्हा चौघांविरुद्ध शस्त्र अधिनियम कलम २५ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. (दुचाकीने धडक दिली, आणि चौघांनी मिळून भावंडाना घरात घुसून मारहाण केली)
चंद्रपुरातील जुनोना बल्लारपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत २२ मार्च रोजी पोलिसांना गावातील सरपंचाने माहिती दिली कि काही अल्पवयीन मुले हातात तलवार घेत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. माहिती मिळाल्यावर बल्लारपूर पोलीस जुनोना मधील कोपुलवार रिसॉर्ट मध्ये गेले असता त्याठिकाणी ४ मुले आढळून आली.
पोलिसांनी त्यांना इथे कशाला आलात याबाबत विचारणा केली असता १० वर्षीय सक्षम रवि मंत्रीवार यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही पार्टी करण्यासाठी आलेलो आहे. पोलिसांनी मुलांना विश्वासात घेत तलवारी बाबत विचारणा केली असता ती तलवार केक कापण्यासाठी आणली असल्याचे सांगितले. पोलीस येत असल्याची माहिती मिळाल्याने ती तलवार रिसॉर्टच्या वॉलकम्पाऊंड च्या बाजूला कचऱ्यामध्ये लपवून ठेवली होती.
पोलिसांनी तलवार जप्त केली, लोखंडी मूठ असलेली धारदार पात्याची तलवार किंमत ३५० रुपये पोलिसांनी जप्त करीत १८ वर्षीय बर्थडे बॉय सक्षम रवि मंत्रीवार, तिरुपती अशोक कटकमवार व २ विधिसंघर्ष बालक यांच्याविरुद्ध बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.
Leave a Comment