Gambling Raid : ब्रम्हपुरी - तालुक्यातील मौजा भुज मध्ये शंकरपट सुरु असलेल्या सार्वजनिक ठिकाणी झेंडामुंडीचा जुगार खेळल्या जात होता, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी त्या जुगार अड्ड्यावर धाड मारली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली तर काही जुगार बहाद्दर पोलिसांना बघून पळून गेले. (विषारी मुलीचे व्हॉइस सॅम्पल उलगडणार हत्येचं गुपित)
चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंदे जुगार, सट्टा पट्टी मोठ्या प्रमाणात सुरु आहे, या धंद्यामागे राजकीय आशीर्वाद असल्याने त्यावर कारवाई होत नाही अशी माहिती आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा भुज गावात सार्वजनिक ठिकाणी काही इसम हे झेंडामुंडी वर पैश्याची बाजी लावत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक त्याठिकाणी पोहोचले, पोलिसांना बघताच काही जुगार बहाद्दरांनी त्याठिकाणाहून पळ काढला तर एक इसम पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव ६० वर्षीय मनोहर जानुजी कुकुळकार सांगितले.
या कारवाईत झेंडामुंडीचे बॅनर, नगदी ३६० रुपये जप्त करीत आरोपी कुकुळकार वर महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अनव्ये ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
Leave a Comment