बाप रे! घर झाडण्यासाठी 'झाडणे' गोळा करायला गेल्या अन् वाघाने केली शिकार

February 27, 2026 by Prakash Hande

Brahmapuri Tiger Attack : ब्रह्मपुरी -  तालुक्यातील पद्मापूर येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या यमुना बाजीराव मडावी (७०) या वृद्ध महिलेचा मृतदेह आज सकाळी शेतशिवाराजवळील नर्सरीमध्ये आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार, वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वर्ष २०२६ मध्ये या घटनेसह चौघांचा वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून यामध्ये १ बिबट व ३ वाघांच्या हल्ल्याचा समावेश आहे. (वाघाला बघायला गेली आणि पडला, मग वाघाने केला हल्ला)

 

पद्मापूर येथील रहिवासी असलेल्या यमुना मडावी या घर झाडण्यासाठी लागणारे 'झाडणे' गोळा करण्यासाठी गावातील शेताशेजारील जंगल नर्सरीत गेल्या होत्या. मात्र, त्या सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. सलग तीन दिवस शोध घेऊनही त्यांचा पत्ता लागला नव्हता. अखेर, आज २७फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

 

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा पूर्ण करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. वनविभागाच्या वतीने मृताच्या कुटुंबीयांना २५ हजारांची सानुग्रह आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली आहे.

Leave a Comment

+