Missing Girls : ब्रम्हपुरी - (चंद्रपूर) जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात एकाच महिन्यात ३ मुली बेपत्ता झाल्याने पालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, काही दिवसांपूर्वी कोचिंग मध्ये शिक्षण घेणारी व १२ वीचा पेपर देण्यासाठी गेलेल्या २ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. आता सदर घटनेला काही दिवस उलटत नाही तर ११ मार्च ला पुन्हा १७ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली. (ब्रम्हपुरी तालुक्यातील २ अल्पवयीन मुली बेपत्ता)
१७ वर्षीय मुलगी हि वर्ग ११ वी मध्ये असून शाळेला सुट्ट्या लागल्या असल्याने अल्पवयीन मुलगी घरीच राहते, ११ मार्च रोजी आई-वडील शेतात कामाला गेले होते तर २ मुले हे जिल्हा परिषद शाळेत गेले असल्याने मोठी मुलगी हि घरी होती. सायंकाळी आई-वडील शेतात काम करून परतले, त्यावेळी २ मुले घरी होती मात्र मोठी मुलगी घरी नसल्याने दोघांना विचारणा केली असता ती कुठे गेली हे माहित नसल्याचे सांगितले.
आई-वडिलांनी मुलीचा संपुन गावात शोध घेतला मात्र ती कुठेही आढळून आली नाही, नातेवाईकांकडे मुलींबाबत विचारणा केली मात्र काही पत्ता लागला नाही, त्यामुळे वडिलांनी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताने मुलीला फूस लावून पळविल्याची तक्रार दिली. पोलिसांनी कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करीत मुलीचा शोध सुरु केला आहे.
Leave a Comment