Bramhapuri News : ब्रह्मपुरी (चंद्रपूर) - शेतात पाणी सोडण्यासाठी नदीमध्ये लावलेले मोटारपंप अज्ञात इसमाने चोरून नेल्याची तक्रार २ फेब्रुवारी रोजी ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली होती, गोपनीय माहिती व तपासात या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. (चिल्ड वॉटर पाण्याच्या प्लांट मध्ये दारूचा अड्डा)
शेतात पाणी टाकण्यासाठी अनेक शेतकरी मोटारपंप नदीमध्ये लावण्यात येतात, आता त्या पंपावर सुद्धा चोरांचा डोळा असून सोनेगाव तालुका ब्रह्मपुरी मधील फिर्यादी सोमेश्वर श्रीराम दवे यांनी २ फेब्रुवारीला तक्रार दिली कि अज्ञात इसमाने नट बोल्ट काढून चोरी केली होती.
याबाबत ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली, गुन्हे शोध पथकाने तपासाला सुरुवात केली, अश्यातच पोलिसांना मुखबीरद्वारे माहिती मिळाली कि दोन इसम हे सोनेगाव मधील शेतशिवारात मोटारपंप लपवून ठेवला आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी अनिल रामजी मंद व राजू सहदेव चावणे या दोघांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी नदी मध्ये लावलेले मोटारपंप चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी आरोपीजवळून एकूण ४ मोटारपंप जप्त केले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या नेतृत्वात सपोनि मनोज खडसे, मुकेश गजबे, वशिष्ट रंगारी, प्रवीण भिवगडे, निलेश तुमसरे, इर्शाद खान व स्वप्नील पळसपगार यांनी केली.
Leave a Comment