Bramhapuri Police : ब्रह्मपुरी (चंद्रपूर) - गावात सर्कस खेळ सुरु होता, खेळ संपल्यावर त्या तांदूळ व खाण्याच्या वस्तू मागत होत्या मात्र अश्यातची खेळ दाखविणाऱ्यानी चोरीचा खेळ केला व एका महिलेच्या घरातून सोने चोरी केले, ब्रह्मपुरी पोलिसांच्या तपासात २ महिलांना अटक करण्यात आली असून चोरी गेलेले सोने सुद्धा जप्त करण्यात आले आहे. (कोरपण्यात पोलिसांचा फिल्मी स्टाईल पाठलाग)
५ फेब्रुवारीला ५० वर्षीय शिला मानकर यांनी तक्रार दिली कि ४ फेब्रुवारी रोजी अज्ञातांनी घरातील कुकर मध्ये ठेवलेल्या १० ग्राम सोन्याचा गोप व २ नग कानातील जोडीसह रोख रक्कम चोरून नेली, ब्रह्मपुरी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला.
पोलिसांनी परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली असता त्यांना मुखबीरद्वारे माहिती मिळाली कि काही बाहेर गावातील महिला मुई गावात सर्कस खेळ दाखविण्यासाठी आले होते, खेळ संपल्यावर महिला घरोघरी तांदूळ व खाण्याच्या वस्तू मागणीसाठी फिरत होत्या, शीला मानकर यांच्या घरी झालेल्या चोरीत त्यांचा सहभाग आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी नागभीड ते ब्रह्मपुरी रोडवरील खुल्या जागेवर डेरा टाकून सदर महिला बसून होत्या त्या ठिकाणी पोलिसांनी पंचासमक्ष दोन महिलांना विश्वासात घेत माहिती घेतली असता त्यांनी मानकर यांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली. Bramhapuri Police
पोलिसांनी ४० वर्षीय चंदा सिकंदर सय्यद, ३० वर्षीय मदिना अल्ताफ शेख दोन्ही राहणार दरेगाव तालुका मालेगाव नाशिक याना ताब्यात घेत त्यांच्याजवळून सोन्याचे दागिने रोख रक्कम असा एकूण २ लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दारासिंग राजपुत, पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या नेतृत्वात मुकेश गजबे, वशिष्ठ रंगारी, प्रवीण भिवगडे, निलेश तुमसरे, इर्शाद खान व स्वप्नील पळसपगार यांनी केली.
Leave a Comment