Chanakya of Chandrapur Politics : चंद्रपूर - राजकारणात कधी काय घडणार याचा नेम नाही, चंद्रपूर शहर मनपा महापौर निवडणुकीत भाजपने कांग्रेसच्या तोंडाचा घास हिरावला, यामुळे कांग्रेस दुखावली आहे, महाविकास आघाडीमधील घटकपक्ष शिवसेना उबाठा ने ऐनवेळी भाजपसोबत हातमिळवणी करीत कांग्रेसला सत्तेपासून रोखले. या सर्व घडामोडी घडणे आणि ऐनवेळी भाजपची सत्ता येणे याचे श्रेय हे भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आहे. शांत डोक्याने राजकारण कसे करावे हे इतर पक्षांना मुनगंटीवार यांच्यापासून शिकणे गरजेचे आहे. (चंद्रपुरात एका मताने इतिहास घडला)
मनपा निवडणुकी आधी भाजपात मोठा गोंधळ उडाला होता, एबी फॉर्म वाटप, ऐनवेळी उमेदवारांची अदलाबदली झाली मात्र मुनगंटीवार यांनी सर्व परिस्थिती शांतपणे हाताळली. उडालेल्या गोंधळामुळे पक्ष अडचणीत येऊ नये यासाठी मुनगंटीवार प्रयत्नशील होते. निवडणूक पार पडली. वर्ष २०१७ मध्ये स्पष्ट बहुमत मिळणाऱ्या भाजप पक्षाला केवळ २३ जागेवर समाधान मानावे लागले, भाजप बहुमतापासून दूर फेकल्या गेला त्यानंतरही मुनगंटीवार परिस्थीवर लक्ष ठेवून होते.
कांग्रेस पक्षाला २७ जागा मिळाल्या मात्र आपसात त्यांचं भांडण सुरु होत, सत्ता कुणाची बसणार यावर सस्पेन्स कायम होता मात्र सुधीर मुनगंटीवार हे प्रसारमाध्यमांसमोर महापौर हा भाजपचा बसणार हे सांगत होते. याउलट कांग्रेसचे आमदार वडेट्टीवार हे भाजप फक्त हवाबाजी करीत आहे, ते फक्त तोंडाच्या वाफा काढतात, महापौर हा आमच्या पक्षाचा होणार असे रोज सकाळी वडेट्टीवार माध्यमांसमोर बोलू लागले. वडेट्टीवार व धानोरकर यांनी शिवसेना उबाठा व वंचित आघाडीच्या नगरसेवकांना सोबत घेत सत्ता वाटपाचा फॉर्म्युला मध्ये काय तडजोड होणार यावर भाष्य करीत नव्हते.
कांग्रेस महापौर पदासाठी भांडत राहली, या दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपडून महापौर पदासाठी नगरसेवक संगीता खांडेकर व उपमहापौर पदासाठी संजय कंचर्लावार यांची नावे अधिकृतपणे घोषित केली. बहुमत नसताना भाजप मनपात सत्ता स्थापन करू शकत नाही असे कांग्रेस पक्षाला वाटले, मात्र मुनगंटीवार यांनी कांग्रेसच्या भांडणावर लक्ष ठेवत काय घडामोड होत आहे यावर विचार करीत अखेरच्या क्षणी हुकूम चा एक्का बाहेर काढत मनपात समर्थन देणाऱ्या पक्षाला सत्तेची योग्य विभागणी करून दिली व भाजपला सुखद तर कांग्रेसला दुःखद धक्का देत चंद्रपूर मनपावर सत्ता स्थापन केली. Chanakya of Chandrapur Politics
सत्तेपासून दूर असताना चंद्रपूर मनपात भाजपची सत्ता येणे कठीण होते मात्र मुनगंटीवार यांच्या राजकीय कारकीर्द व अनुभवाच्या बोलातून त्यांनी हे सर्व शक्य करून दाखविले, स्थानिक कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम हे सुधीर मुनगंटीवार यांनी करून दाखविले, चंद्रपुरात अनेक विकासाची व नागरिकांच्या हिटाची कामे या ५ वर्षात होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मुनगंटीवार यांच्या गुगलीने दोन्ही कांग्रेस नेत्यांना बाद व्हावे लागले हे विशेष.
Leave a Comment