Chandrapur Crime Alert : चंद्रपूर - चंद्रपूर शहरात सध्या गुन्हेगारीने तोंड वर काढले आहे, खून, दरोडे, घरफोडी अश्या सारखे गंभीर गुन्हे सर्रास घडत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, शहरात अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी नियमित गस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (बल्लारपुरात जिवंत काडतूस सह देशी कट्टा जप्त)
शहरातील वडगाव भागातील नागरिकांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गस्त वाढवावी या मागणीचे निवेदन २१ एप्रिल रोजी दिले असून विठ्ठल रुख्माई नगर आकाशवाणी मार्गावर काही दिवसांपासून मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकी वाहनावर काही युवक संशयास्पद फिरत असल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे.
९,१४,१६ व २१ एप्रिल या काळात काही युवक संशयास्पद पद्धतीने फिरत आहे, याच भागात ६ जानेवारीला जनार्धन कांबळी यांच्याकडे चोरी झाली होती, त्याबाबत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा देण्यात आली होती, पुन्हा तशी अनुचित घटना रुख्माई नगर भागात घडायला नको याकरिता पोलिसांनी गस्त वाढवीत नागरिकाची भीती दूर करावी या मागणीचे निवेदन संतोष सूर व रमण निमकर यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दिले आहे.
Leave a Comment