Chandrapur Crime News Today : चंद्रपूर - रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ३ घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगाराला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने अटक करीत तब्बल २१ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (१० टक्के व्याजाचे आमिष देत चंद्रपुरात कोट्यवधींची फसवणूक)
१४ फेब्रुवारीला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना घरफोडीच्या गुन्हेगाराबाबत गोपनीय माहिती मिळाली, माहितीच्या आधारे पोलिसांनी २५ वर्षीय मोहम्मद सरफरोज सगीर राहणार आमटे ले-आउट रयतवारी कॉलोरी चंद्रपूर व ३० वर्षीय सद्दाम मुस्ताक शेख राहणार बँक ऑफ इंडियाच्या मागे घुग्गुस चंद्रपूर याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इंदिरानगर, क्रिष्णानगर व शामनगर परिसरात ३ ठिकाणी घरफोडी केली असल्याचे कबूल केले.
पोलिसांनी आरोपीकडून सोन्याचांदीचे दागिने असा एकूण २१ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, दोन्ही आरोपींवर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार यांनी केली.
1 Comments
Thank you for Good news...34 News and Ramnagar Police station Chandrapur.