Chandrapur crime update : घुग्गुस (चंद्रपूर) - घुग्गुस शहरातील बैरम बाबा नगरातील वेकोलिचे सेवानिवृत्त कर्मचारी नागेश गुंडेट्टी यांच्या घरी १५ फेब्रुवारीला अज्ञाताने प्रवेश करीत रोख व चांदीचे दागिने असा एकूण १८ हजार रुपयांचा माल लंपास केला. याबाबत गुंडेट्टी यांनी घुग्गुस पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली आहे. (चंद्रपुरात ४० वर्षांपूर्वी टाकलेला केबल चोरीला)
१४ फेब्रुवारीला गुंडेट्टी यांच्या पत्नीच्या मावशीचे निधन झाल्याने गुंडेट्टी कुटुंब सुभाष नगर मध्ये गेले होते, दुसऱ्या दिवशी १५ फेब्रुवारीला नागेश गुंडेट्टी घरी परतले असता घरातील सामान अस्तव्यस्त स्थितीमध्ये होते. त्यांनी याबाबत मुलाला माहिती दिली. मुलगा व गुंडेट्टी यांनी पत्नी घरी आले, बेडरूम मध्ये असलेले कपात खुले होते, त्यामधील रोख व चांदीचे दागिने गायब होते.
घरी कुणी नसल्याचा फायदा घेत अज्ञाताने प्रवेश करीत चोरी केल्याची खात्री पटल्यावर याबाबत गुंडेट्टी यांनी घुग्गुस पोलीस स्टेशन गाठत फिर्याद नोंदवली, पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला आहे. चंद्रपुरात सध्या घरफोडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, आता तर नागरिकांना घर सोडून बाहेर जाणे म्हणजे चोराला निमंत्रण देणे होय अशी परिस्थिती झाली आहे.
Leave a Comment