Chandrapur Krishi Mahotsav । ५ दिवसांची पर्वणी! चांदा क्लब ग्राउंडवर पशु-पक्षी प्रदर्शन; चंद्रपूरकरांची मोठी गर्दी

March 20, 2026 by Prakash Hande

Chandrapur Krishi Mahotsav 2026 : चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा केली आहे. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ आता शेतक-यांसोबतच शेतमजुरांनासुध्दा मिळणार आहे. कृषी क्षेत्राच्या विकासाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून शेतक-यांच्या मागे शासन भक्कमपणे उभे आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले. (पॉक्सो कायद्याबाबत चंद्रपूर जिल्हा प्रशासनाची जनजागृती)

 

चांदा क्लब येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभागपशुसंवर्धन विभागजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाउमेद आणि माविम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कृषीपशु-पक्षी प्रदर्शन व मिनी सरस हिराई महोत्सव आयोजित करण्यात आला आहेया महोत्सवाचे उद्घाटन करतांना पालकमंत्री डॉवुईके बोलत होते.

 

यावेळी मंचावर चंद्रपूर शहराच्या महापौर संगिता खांडेकरखासदार प्रतिभा धानोरकरआमदार किशोर जोरगेवारदेवराव भोंगळेमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहअतिरिक्त जिल्हाधिकारी डॉनितीन व्यवहारेमनपा आयुक्त अकुनुरी नरेशअतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडेअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागरप्रकल्प संचालक मंजिरी टकलेजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावारआत्माचे प्रकल्प संचालक अरुण कुसळकरपशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉसुरेश कुंभरेअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नूतन सावंतगिरीश धायगुडेशिक्षणाधिकारी अश्विनी केळकर चंद्रशेखर शेट्टी आदी उपस्थित होते.

 

या प्रदर्शनीमध्ये 325 स्टॉलची उभारणी करण्यात आली आहेअसे सांगून पालकमंत्री डॉवुईके म्हणालेप्रदर्शनीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांचे सादरीकरण सर्वत्र पोहोचावेचंद्रपूर जिल्ह्यात महिला बचत गटाचे काम मोठे आहेकृषी विषयक योजनांचा प्रचार व प्रसार शेवटच्या घटकांपर्यंत पोहचला पाहिजे1मार्च 2026 रोजी किसान सन्मान निधीचा 22 वा हप्ता वाटप करण्यात आलायात जिल्ह्यातील लक्ष 46 हजार 307 शेतकऱ्यांच्या खात्यात 49 कोटी 26 लाख रुपये जमा झाले आहेकर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहेग्रामीण महिला बचत गटासाठी तालुका स्तरावर प्रशिक्षण केंद्र आणि इमारत बांधण्याकरिता निधी देण्यात येईलअसे पालकमंत्री यांनी सांगितलेतत्पूर्वी पालकमंत्री यांच्या हस्ते फीत कापून कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी विविध स्टॉलची पाहणी केली. Livestock Exhibition 2026

 

खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्याशेतीमध्ये आगळावेगळा प्रयोग करणे अत्यंत गरजेचे झाले असून केंद्र व राज्याच्या अनेक कृषी विषयक योजना शेवटच्या घटकांपर्यंत अधिकाऱ्यांनी पोहचवाव्यातबचत गटाच्या उत्पादनासाठी तालुका स्तरावर विक्री केंद्र उपलब्ध करून द्यावेअशी मागणी त्यांनी केलीयावेळी महापौर संगिता खांडेकर यांनी सुध्दा मार्गदर्शन केलेकार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केलेसंचालन एकता बंडावार यांनी तर आभार शिवकुमार पुजारी यांनी मानले.

 

कृषी उद्योजक निर्माण करण्याची गरज : आमदार किशोर जोरगेवार

कृषी आणि संलग्न व्यवसायातून चंद्रपूरची नवी ओळख निर्माण होत आहेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चंद्रपूरकडे विशेष लक्ष असून बचत गटाचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले आहेउमेदच्या माध्यमातून लखपती दीदी तयार होत आहेमहिलांना डिजिटल साक्षर होण्याची गरज आहेबांबूक्षेत्रातही शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावेचंद्रपूरला पर्यटनाच्या क्षेत्रातून विकसित करावेऍग्रो टुरिझमलाही जिल्ह्यामध्ये चांगली संधी आहेआज शेतीचा पॅटर्न बदलला असून कृषी उद्योजक निर्माण करण्याची गरज आहेअसे मत किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले.

 

कृषी आणि पशु प्रदर्शनाचे अतिशय चांगले नियेाजन : आमदार देवराव भोंगळे

जिल्हास्तरीय कृषी महोत्सव हा चंद्रपूरकरांसाठी एक पर्वणी असतेया माध्यमातून जनतेपर्यंत कृषी विषयक व संलग्न योजनांचा प्रचार प्रसार होतोआज येथे कृषी आणि पशु प्रदर्शनाचे अतिशय चांगले नियोजन करण्यात आले आहेपशुंच्या प्रजाती ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजेजिल्हास्तरीय पाच दिवसांच्या कृषी प्रदर्शनीचा जिल्ह्यातील सर्व शेतकरी नागरिकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.

 

समुदाय निधी धनादेश वाटप : 1) मध संकलन केंद्राकरिता लक्ष्मी प्रभाग संघ यांना 50 लक्ष रुपयांचा धनादेश, 2) आजीविका ग्रामीण वाहतूक करिता सक्षम प्रभाग संघ यांना 51 लक्षाचा धनादेश, 3) समूह गुंतवणूक निधी करिता क्षितिज प्रभाग संघ यांना कोटीचा धनादेश, 4) समूह गुंतवणूक निधी म्हणून नारीशक्ती प्रभाग संघ यांना कोटीचा धनादेश, 5) एकात्मिक शेती करिता मातोश्री प्रभाग संघ यांना 30 लक्ष रुपयांचा रुपये धनादेश, 6) समूह गुंतवणूक निधी अंतर्गत अस्मिता प्रभाग संघ यांना 54 लक्षाचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 

कृषी महोत्सवाचे प्रमुख्य वैशिष्टये : 1) शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी व कृषी संलग्न विभागाच्या योजना / उपक्रमांची माहिती 2) महिला स्वयंसहायता गटांमार्फत उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री 3) कृषी विद्यापिठाने विकसीत केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती 4) अनुभवी आणि प्रगतशील शेतक-यांचे मार्गदर्शन 5) कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत विविध खाजगी कंपन्यांची अद्यावत तंत्रज्ञानाची कृषी औजारे 6) सुक्ष्म सिंचन - ठिबक / तुषार संचांची प्रात्यक्षिके 7) उत्पादक ते ग्राहक थेट विक्री

Leave a Comment

+