Chandrapur Road Accident : चंद्रपूर - चंद्रपुरात सध्या अपघाताची मालिका सुरु आहे, काही दिवसांपूर्वी शहरातील जनता कॉलेज चौक परिसरात एसटी बसच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू झाला होता, आज २३ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास भरधाव असलेल्या ट्र्क ने पायदळ जात असलेल्या व्यक्तीला चिरडले, या अपघातात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. (भाऊ माझ्या हातून वडिलांचा खून झाला, १९ वर्षीय मुलाने घेतला वडिलांचा जीव)
चंद्रपूर ते मूल मार्गावरील वन अकादमी समोर आज दुपारच्या सुमारास एक व्यक्ती पायदळ जात असताना मागून आलेल्या भरधाव ट्र्कची त्या व्यक्तीला जोरदार धडक बसली या धडकेत ती व्यक्ती जागीच गतप्राण झाली. अपघात झाल्यावर ट्र्क चालकाने पळ काढला व सरळ पोलीस स्टेशनमध्ये वाहन लावले अशी माहिती आहे.
मृतक व्यक्तीची अद्याप ओळख पटली नाही, अपघाताची माहिती मिळताच रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
Leave a Comment