Chandrapur RTO । चंद्रपुरात ५०० रुपयांची लाच अन् आरटीओ अधिकारी थेट पळाले! नागपूर एसीबीच्या कारवाईने खळबळ

March 23, 2026 by Prakash Hande

Chandrapur RTO Bribery Case : चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील आरटीओ चेक पोस्ट लक्कडकोट मध्ये कागदपत्र तपासणीच्या नावावर एंट्री म्हणून मोटार वाहन निरीक्षकाने खाजगी एजंट मार्फत मालवाहू ट्रक चालकाला ५०० रुपयांची लाच मागितली, मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या कारवाईची चाहूल लागताच मोटार वाहन निरीक्षक पवन प्रभाकर पोटदुखे व आरटीओ एजंट विलास विठोबाजी देशमुख यांनी पळ काढला. विशेष बाब म्हणजे यापूर्वीही आरटीओ चेकपोस्ट लक्कडकोट मध्ये अमरावती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाली होती. (वाढदिवसाच्या दिवशी बर्थडे बॉय वर गुन्हा दाखल)

 

चंद्रपूर जिल्ह्यातील लक्कडकोट व परसोडा आरटीओ चेक नाक्यावर खाजगी एजंट लावत मोठ्या प्रमाणावर अवैध वसुली केल्या जाते. तेलंगाणा सीमेवर असणाऱ्या या नाक्यावरून दररोज हजारो अवजड वाहने ये-जा करतात.  फिर्यादी हा ट्र्क चालक असून त्याच्या ताब्यातील मालवाहू वाहन हे त्या नाक्यावरून जात असते, यापूर्वी कागदपत्रे तपासणीच्या नावावर एंट्री म्हणून पैश्याची मागणी केली होती. याबाबत २० मार्चला फिर्यादी चालकाने याबाबत नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केल्यावर लाचलुचपत विभागाने सापळा रचला. २३ मार्चला फिर्यादीचा ट्र्क हा आसिफाबाद वरून नागपूरला जात होता.

 

आरटीओ अधिकाऱ्यांनी वसुलीकरिता नेमलेल्या खाजगी एजंट विलास देशमुख यांनी ट्र्क चालकाला ५०० रुपयाची लाच मागत स्वीकारली मोटार वाहन निरीक्षक पवन पोटदुखे यांनी त्यास प्रोत्साहन दिले, लाचलुचपत विभागाच्या सापळा कारवाईची चाहूल लागताच पोटदुखे व देशमुख यांनी घटनस्थळावरून पळ काढला. कार्यालयीन खोलीत एसीबी ने झडती घेतली असता त्यामध्ये एंट्री म्हणून जमा केलेले ७ हजार १२० रुपये व लाच रक्कम ५०० रुपये सह दोन्ही आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले.  ACB Trap Chandrapur

 

सध्या आरोपींच्या घरची झडती घेण्याची प्रक्रिया सुरु असून याबाबत भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ (अ), १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत विभाग अनिल जित्तावार, पोलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, पो हवा विलीन तांबडे, पोशी सोमेश्वर वाईलकर, प्रफुल भातूलकर, मपोशी स्वाती हिंडोरिया यांनी केली असून पुढील तपास नीलेश उरकुडे,पोलीस निरीक्षक ला.प्र.वी. चंद्रपूर करीत आहे.

Leave a Comment

+