Chandrapur woman suicide । चंद्रपूर हादरलं! बाबुपेठ भागात महिलेने उचललं टोकाचं पाऊल

March 18, 2026 by Prakash Hande

Chandrapur woman suicide case : चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील बाबुपेठ भागात ४५ वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सायंकाळच्या सुमारास हि घटना उघडकीस आली. (मध्यप्रदेशातून चंद्रपुरात चोरी, गुन्हे शाखेने पकडलं टोळकं)

 

बाबुपेठ मधील समता चौकात राहणाऱ्या ४५ वर्षीय दर्या दीपक माहूरकर या महिलेने राहत्या घरी पंख्याला ओढणीद्वारे गळफास लावत आत्महत्या केली, महिला घरी एकटी असताना हि घटना घडली. महिलेला पती, एक मुलगी व मुलगा असा आप्त परिवार असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

 

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, महिलेने आत्महत्या का केली याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहे.

Leave a Comment

+