चंद्रपूर - चित्रपटात हिंसेचा अतिरेक झाल्याने आजची तरुण पिढी सुद्धा चित्रपटातील कथानक प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न करीत असतो, मात्र ते कथानक गंभीर गुन्हेगारीमध्ये बदलतं, चंद्रपूर शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असून किरकोळ कारणावर थेट शस्त्रे चालविण्याचे फॅड तरुणाईमध्ये आले आहे. चंद्रपूर पोलिसांनी दोन युवकांना ताब्यात घेतले असून शस्त्राद्वारे परिसरात दहशत माजवीत गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. (चंद्रपुरातील वाहतूक व्यवस्था व्हेन्टिलेरवर, शहरात भीषण अपघातात दोघांचा मृत्यू)
रहमत नगरातील २ युवक स्वतःजवळ धारदार शस्त्रे बाळगत गोल बाजार परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, माहितीच्या आधारे पोलिसांनी गोल बाजार परिसरात सापळा रचत दोघांना ताब्यात घेतले. दोघे युवक विना नंबरची दुचाकी घेऊन फिरत होते , त्यांच्या वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये धारदार तलवार व छोटा चाकू आढळून आला.
दोन्ही युवक सराईत गुन्हेगार आहे, यामध्ये २४ वर्षीय अमन खान अहमद खान व २१ वर्षीय सैय्यद अबू तबरेज सैय्यद शकील दोघेही राहणार रहमत नगर, पोलिसांनी याप्रकरणी विना नंबरची दुचाकी सह चाकू व तलवार असा ४० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची यश्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलते, पोउपनि विलास निकोडे, भावना रामटेके, सचिन बोरकर, संजय धोटे, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, कपूरचंदं खरवार, रुपेश पराते, विक्रम मेश्राम, योगेश पिदूरकर, निलेश ढोक, प्रफुल भैसारे, सुशांत धिवे व दीपिका झिंगरे यांनी केली.
Leave a Comment