Chimur Police Crime News : चिमूर - दुचाकीने रसवंतीच्या ठेल्याला धडक दिली, नुकसान भरून दे म्हटल्यावर ठेला चालकाला चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना चिमूर शहरात २० मार्चला घडली. याप्रकरणी ४ युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (घरात कलह, विवाहितेने थेट नदीत मारली उडी)
२५ वर्षीय सत्यदेव मनिस्टर सिंग कुशवाह हे उसाच्या रसाचा ठेला चालवीत आपला उदरनिर्वाह करतात, २० मार्चला सत्यदेव हे रात्री १० वाजेदरम्यान महाराष्ट्र बॅंकेसमोरील सात नाला रस्त्यावरून जात असताना निलेश रंदये यांनी आपल्या दुचाकीने ठेल्याला जोरदार धडक दिली, या धडकेत ठेल्याचे नुकसान झाले. सत्यदेव ने निलेश ला नुकसान भरपाई मागितली असता त्याने आपल्या मित्रांना फोन करून बोलाविले.
यावेळी भविष्य गावतुरे, नयन गावतुरे, लोकेश निकुडे राहणार शिरपूर हे त्याठिकाणी आले, चौघांनी मिळून लाता बुक्क्यांनी सत्यदेव ला मारहाण केली, उपस्थित नागरिकांनी मध्यस्ती केली आणि भांडण सोडविले. सत्यदेव घरी आला मात्र चौघे युवक त्याच्या मागोमाग घरी आले आणि सत्यदेव व त्याचा भाऊ परिमल या दोघांना घरात घुसून मारले. व दोघा भावांचा ठेला सुद्धा तोडण्यात आला, या मारहाणीत सत्यदेव चे ५० हजारांचे नुकसान झाले. चारही युवक हे दारूच्या नशेत होते, विशेष बाब म्हणजे आरोपी युवक हे परिमल च्या ठेल्यावर नियमित उसाचा रस प्यायला येत होते, ते दोन्ही भावांना ओळखत होते, मात्र त्यानंतरही दारूच्या नशेत युवकांनी दोन्ही भावंडाना मारहाण केली.
याबाबत सत्यदेव ने चिमूर पोलीस स्टेशनमध्ये चारही युवकांविरुद्ध तक्रार दिली, पोलिसांनी अआरोपी युवकांवर कलम 333, 331(5), 331(6), 118(), 324(4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला.
Leave a Comment