Coaching Class Regulation । NEET-JEE च्या नावाखाली अव्वाच्या सव्वा फी? अभिनव देशपांडे थेट शिक्षण विभागात धडकले!

March 20, 2026 by Prakash Hande

Coaching Class Regulation Chandrapur : चंद्रपूर - शहरातील खासगी कोचिंग क्लासेस, विशेषतः नीट (NEET) आणि जेईई (JEE) च्या नावाखाली पालकांची होणारी आर्थिक लूट आणि विद्यार्थ्यांवरील वाढता मानसिक ताण या विषयावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिनव देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली आज शिक्षण अधिकाऱ्यांना जाहीर निवेदन देण्यात आले. (युवासेनेच्या तक्रारीनंतर प्रशासन नरमले)


​विदर्भाचे शैक्षणिक केंद्र म्हणून चंद्रपूरची ओळख निर्माण होत असतानाच, दुसरीकडे खासगी शिकवणी वर्गांचे पेव फुटले आहे. अनेक क्लासेस कोणत्याही नियमावलीचे पालन न करता अव्वाच्या सव्वा फी वसूल करत आहेत. या संदर्भात विद्यार्थ्यांच्या तक्रारी लक्षात घेता, अभिनव देशपांडे यांनी शिक्षण विभागाचे लक्ष वेधले आहे.

​निवेदनातील प्रमुख मागण्या:

​फी संरचनेत पारदर्शकता: प्रत्येक कोचिंग क्लासने आपली फी निश्चित करावी आणि तिचे फलक दर्शनी भागात लावावेत. मधल्या काळात होणारी अनपेक्षित फी वाढ थांबवावी.

​पायाभूत सुविधांची तपासणी: अनेक क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त गर्दी असते. तेथे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि आपत्कालीन सुरक्षेची (Fire Safety) काय स्थिती आहे, याची शिक्षण विभागाने चौकशी करावी.

 

​मानसिक आरोग्य समुपदेशन: स्पर्धा परीक्षेच्या दबावामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणाव वाढत आहे. प्रत्येक मोठ्या क्लासमध्ये अधिकृत समुपदेशकाची नियुक्ती अनिवार्य करावी.

​बेकायदेशीर जाहिरातींवर बंदी: शंभर टक्के निकालाचे खोटे आमिष दाखवून पालकांची दिशाभूल करणाऱ्या क्लासेसवर कठोर कारवाई करण्यात यावी.
या वेळे आकाश निरटवार विधानसभा अध्यक्ष,राहुल वाघ महासचिव,प्रतीक देशपांडे शहर उपाध्यक्ष, विपील लाभने महासचिव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

+