"टायगर अभी जिंदा है!" प्रतिभा धानोरकर ठरवणार चंद्रपूरचा नवा महापौर

February 03, 2026 by Prakash Hande

Congress Delhi Meeting Verdict : चंद्रपूर - गटनेता व महापौर पदावरून चंद्रपुरात आमदार विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात सुरु झालेला वाद दिल्लीत निकाली निघाला असून यामध्ये खासदार धानोरकर यांचा गट व गटनेता पदावर केसी वेणुगोपाल राव यांनी सहमती दर्शविली आहे. महापौर पद खासदार प्रतिभा धानोरकर ठरविणार तर अडीच वर्षांनी महापौर पद हे मित्र पक्षाला देणार असल्याची माहिती आहे. महापौर-गटनेता पदावरून सुरु झालेला वादावर दिल्लीत तोडगा निघाला. या वादात अनेकांना धोबीपछाड देणाऱ्या खासदार धानोरकर यांचं नेतृत्व सर्वाना मान्य करावं लागलं आहे. (२० वर्षे सेवा देऊनही खिसा रिकामा, आता आंदोलन उगारणार)

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत कांग्रेस पक्षाने वापसी केली मोठा पक्ष म्हणून पुढे आला, ६६ जागेपैकी २७ जागेवर कांग्रेस पक्षाने विजय मिळविला, मात्र महापौर कुणाचा यावर नेत्यांनी वर्चस्वाची लढाई सुरु केली. महापौर माझ्या गटाचा राहणार यावर दोन्ही नेत्यांचे वेगवेगळे मत होते, नेत्यांच्या वादात नगरसेवक दोन गटात विभागले गेले, प्रदेश अध्यक्ष सपकाळ यांच्या सूचनेनंतर खासदार धानोरकर यांनी गट स्थापन करीत सुरेंद्र अडबाले यांची गटनेता पदी निवड केली मात्र हा निणर्य वडेट्टीवार गटाला मेनी नव्हता, त्यामुळे वाद वाढला. आम्हाला धानोरकर यांचा गट मान्य नाही म्हणत वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी आपला गटनेता निवडला मात्र त्यांचा गट स्थापन झाला नाही. Congress Delhi Meeting Verdict

विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणी करण्यासाठी गेलेल्या वडेट्टीवार गटातील नगरसेवकांच्या पदरी निराशा पडली, त्यामुळे आता हा वाद दिल्लीत सोडवावा लागला, आज ३ फेब्रुवारीला केसी वेणुगोपाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती, आमदार वडेट्टीवार यांनी आपल्या समर्थक नगरसेवकसंह दिल्ली गाठली, बैठकीत वडेट्टीवार व धानोरकर यांनी आपली बाजू मांडली, यावर वेणुगोपाल यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्थापन केलेला गट अंतिम असून उद्या उर्वरित वडेट्टीवार गटातील नगरसेवक कांग्रेसच्या गटात सामील होणार असून महापौर हा प्रतिभा धानोरकर ठरवतील. अडीच वर्षांनी पुढचा महापौर हा मित्रपक्षाचा राहणार असा निर्णय झाला. त्यामुळे धानोरकर-वडेट्टीवार गटातील वादात धानोकर वरचढ राहिल्या. लोकसभा निवडणुकीत विरोधकांना धूळ चारणाऱ्या प्रतिभा धानोरकर ह्या चंद्रपूर महानगरपालिका विजयाच्या व पक्षासाठी घेतलेल्या निर्णयात धुरंधर राहिल्या.

Leave a Comment

+