Dangerous Tiger Attacks : सिंदेवाही (गुंजेवाही) - चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही मध्ये मोहफूल गोळा करण्यासाठी शेतात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करीत ठार केले. चार महिन्यातील हि १३ वी घटना आहे. (मोहफुले वेचायला गेलेल्या ५८ वर्षीय शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू)
उन्हाळ्याच्या हंगामात तेंदूपत्ता व मोहफुले वेचायला जंगलात जाणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या असते, वनविभागाच्या निर्देशाला न जुमानता नागरिक जंगलात जातात. १३ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता गुंजेवाही मधील ३ महिला व १ पुरुष असे चार जण मोहफुले वेचण्यासाठी जंगलालगत असलेल्या शेतात गेले होते. मोहफुले वेचत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने महिलेवर झेप घेतली. महिलेला जबड्यात पकडत वाघाने जंगलाच्या दिशेने धाव घेतली.
सोबत असलेल्या तिघा जणांनी आरडाओरडा केला मात्र तोवर ६० वर्षीय महिला वच्छला ईश्वर वाटगुळे यांचा मृत्यू झाला होता. महिलेला जबड्यात नेत असताना अनेक नागरिकांनी वाघाला बघितले, हे दृश्य दुचाकी चालकाने बघताच गावातील नागरिकांना याबाबत माहिती दिली. पोलीस व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. शोधाशोध केल्यावर महिलेचा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळला.
वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. हंगामाचे दिवस असल्याने काही पैसे कमविण्यासाठी नागरिक जंगलात तेंदूपत्ता व मोहफुले वेचण्यासाठी जात असतात. मात्र अश्यात वन्यप्राणी त्यांची शिकार करतात. पोलीस विभागाने वाटगुळे यांचा मृतदेहाची उत्तरीय तपासणी करणेकामी रुग्णालयात पाठिवले.
1 Comments
Get three of them on adjacent positions to get a bonus symbol that may activate a bonus sport the place you play a mini-slot game with three reels and one payline. ICE.