Dog Attack Case Majri : माजरी (चंद्रपूर) - घराबाहेर खेळत असणाऱ्या ११ वर्षीय मुलीला शेजारी घरातील कुत्र्याने चावा घेत गंभीर जखमी केले, याबाबत माजरी पोलिसांनी कुत्रा मालकावर गुन्हे दाखल केले आहे. (चंद्रपुरात ५५ ग्राम एमडी पावडर जप्त)
१९ मार्चला सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान गुल्शने मदिना मस्जिद जवळ वॉर्ड क्रमांक मध्ये ११ वर्षीय अलसिफा सिद्दीकी हि मुलगी खेळत होती, यावेळी शेजारी राहणारे अक्षय केशव शंकदरवार यांच्या घरातील पाळीव कुत्र्याने अलसिफा ला चावा घेतला, या हल्ल्यात मुलीला डाव्या गालावर, मानेला, डोक्याला, खांद्याला व कमरेला चावा घेत गंभीर दुखापत झाली.
शंकदरवार यांच्या घरातील कुत्रा हा आधीपासूनचं आक्रमक आहे, हे माहित असताना सुद्धा त्यांनी कुत्र्याला निष्काळजीपणाने घराबाहेर सोडले होते, त्यामुळे ११ वर्षीय मुलीला त्याने चावा घेत जखमी केले. माजरी पोलिसांनी या प्रकरणात अक्षय केशव शंकदरवार यांच्यावर कलम २९१, १२५ (B) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
Leave a Comment