Illegal Gambling । गडचांदूर पोलिसांना आव्हान? दिवसाढवळ्या सुरू आहे 'झेंडी मुंडी'चा खेळ

March 19, 2026 by Prakash Hande

Illegal Gambling News : गडचांदूर (चंद्रपूर) - चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहर हे अवैध व्यावसायिकांचे हब बनले असून या शहरात मोठ्या प्रमाणात सट्टा व जुगार खेळला जातो, गडचांदूर पोलिसांना हे सर्व अवैध धंदे सुरु असल्याचे माहित असून सुद्धा कारवाई होत नसल्याने नागरिक सुद्धा आता पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण करू लागले आहे. (एका कुत्र्यामुळे दोन कुटुंबात हाणामारी आणि थेट एट्रोसिटीचा गुन्हा दाखल)

 

यापूर्वी NEWS३४ ने सट्टा व जुगाराच्या बातम्या प्रकाशित केल्या होत्या, बातमी प्रकाशित झाल्यावर काही दिवस अवैध धंद्यांना विराम मिळाला मात्र आता पुन्हा हे अवैध धंदे सुरु झाले आहे, लक्ष्मी हॉल आठवडी बाजार समोर झेंडी मुंडी चा जुगार व सट्टा खुलेआम सुरु आहे. याबाबत समाजमाध्यमांवर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बघा हा व्हिडीओ..

 

लक्ष्मी हॉल समोरील हा व्हिडीओ असून यामध्ये बिनधास्तपणे झेंडी मुंडी सुरु आहे, या धंद्याला पोलीस प्रशासनाची अलिखित परवानगी आहे का? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे. 

Leave a Comment

+