Ghugus Police theft investigation : घुग्गुस (चंद्रपूर) - घुग्गुस पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेणगाव फाटा भाटिया कोल वॉशरीज (एन.एन. ग्लोबल) या कंपनीत मध्ये २० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने चोरून नेला होता, याबाबत घुग्गुस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावत ३ आरोपीना अटक करीत चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. (धाडसी घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक)
१६ मार्च रोजी याबाबत घुग्गुस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली होती, तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपास सुरु केला, गोपनीय माहिती व तांत्रिक पद्धतीने अभ्यास करीत पोलिसांनी दुखनपाल उर्फ दुखा झुरी कैथल, अयान मुस्ताक शेख व साहिल शंकर इंगोले सर्व राहणार घुग्गुस यांना अटक केली.
आरोपीजवळून समरसिबल मोटर पंप, इलेक्ट्रिक वायर सह सेक्शन पंप जप्त करीत कलम ३०३ (२) अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला, आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली . सदरची यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनात सपोनि प्रफुल डाहुले, पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार, अनिल बैठा, विशाल हूड, राकेश तुराणकर, रवींद्र वाभीटकर, महेश भोयर, प्रसन्नजीत डोर्लीकर, पवन डाखरे यांनी केली.
Leave a Comment